Yogesh Verma Video | (Photo Credit: X)

त्यांचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल (Video Video) झाला आहे. ज्यामध्ये एक इसम ही कृती करताना दिसतो आहे. प्राप्त माहिनुसार, उत्तर प्रदेश येथील राखीमपुर खीरी (Lakhimpur Kheri News) स्थित अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत झालेल्या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. त्यावेळी ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, हा वाद आता दोन्ही बाजूच्या समर्थकांमध्ये अधिकच वाढल्याचे समजते.

वादाचे कारण काय?

आमदार योगेश वर्मा आणि अवधेश सिंह यांच्यातील वादाचे कारण सोशल मीडियावर व्हायरल झालेले एक पत्र असल्याचे सांगितले जात आहे. लखीमपुरचे भाजप जिल्हाध्यक्ष सुनील सिंह आणि योगश वर्मा यांचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ज्यामध्ये दोघांनीही ही निवडणूक स्थगित करण्याची मागणी केली आहे. या पत्राची पुष्टी होऊ शकली नाही. मात्र, डीएम संजय सिंह यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, कोणत्याही स्थितीत ही निवडणूक स्थगित होणार नाही. दरम्यान, काही सदस्यांनी आरोप केला आहे की, निवडणुकीसाठी कोणीतरी चक्क मतदारयादीच फाडली आहे.

अर्बन कोऑपरेटिव्ह बँक निवणूक प्रक्रिया

अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेसाठी निवडणूक प्रक्रिया 14 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. मतदान आणि मतमोजणी एकाच दिवशी पार पडते. प्राप्त माहितीनुसार, या निवडणुकीत जवळपास 12 हजार भागधारक मतदान करणार आहेत. त्यासाठी बुधवार म्हणजेच आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार होते. एकूण 10 जागांसाठी ही निवडणूक पार पडणार असून 11 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. अंतिम उमेदवार निश्चित झाल्यानंतर निवडणूक चिन्ह जाहीर केले जाणार आहे.

दरम्यान, डीएम संजय सिंह यांनी म्हटले की, ही निवडणूक पारदर्शी आणि निष्पक्ष पार पडेन. तर दुसऱ्या बाजूला आमदार योगेश वर्मा यांनी कोऑपरेटीव्ह बँक निवडणुकीत अफरातफर झाल्याचा आरोप केला आहे.

भाजप आमदाराला धक्काबुक्की

या वादात अखिलेश यादव यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. समाजवादी पक्षाच्या प्रमुखांनी म्हटले आहे की, अन्याय हा हिंसेला जन्म देतो. कोऑफरेटीव्ह निवडणुकीत लखीमपूरच्या भाजप आमदारांनी घातलेल्या गोंधळामुळे माजी सभापतींच्या पतींनी जो काही शारीरिक वर्तन केले आहे तो प्रकार चर्चेचा ठरला आहे. अशी परिस्थिती उत्पन्न होणे लोकशाहीसाठी घातक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. निवडणुकीतील अफरातफर हेच भाजपचे राजकारण बनले आहे, असेही ते म्हणाले.