January 2019 Bank Holidays list: 2018 हे वर्ष सरत आहे. या वर्षांचे काहीच दिवस बाकी असताना नववर्षाच्या आगमनाचे वेध सर्वांना लागले आहेत. या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात ख्रिसमस (Christmas) आणि बँक कर्मचाऱ्यांचे स्ट्राईक (Strike) यामुळे बँका सलग चार-पाच दिवस बंद होत्या. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली असू शकते. तर आता नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यातही म्हणजे जानेवारी 2019 मध्ये काही दिवस बँका बंद असणार आहेत. तर एक नजर टाकूया जानेवारी महिन्यातील बँक हॉलिडेजवर (Bank Holidays)....
1 जानेवारी- नववर्षाच्या पहिल्या दिवशी देशातील अनेक राज्यात सुट्ट्या दिल्या जातात. त्यामुळे यादिवशी बँकाही बंद असणार. जुने ATM Card 1 जानेवारीपासून होणार बंद; असे घ्या बदलून
12 जानेवारी- स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त पश्चिम बंगालमध्ये बँक हॉलिडे असणार. त्याचबरोबर महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने बँकांचे कामकाज बंद राहील.
14 जानेवारी- या दिवशी पोंगल, लोहडी हे सण असलयाने तेलंगणा, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि आसाम या राज्यात बँकांना सुट्टी असेल.
16 जानेवारी- तामिळनाडूमध्ये संत तिरुवल्लूवर दिन 16 जानेवारीला साजरा केला जातो. यामुळे यादिवशी बँकांचे कामकाज बंद राहील.
23 जानेवारी- सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त आसाम, पश्चिम बंगाल, उडीसा आणि त्रिपूरा या राज्यात बँका बंद राहतील.
26 जानेवारी- प्रजासत्ताक दिन आणि चौथा शनिवार एकाच दिवशी आल्याने संपूर्ण देशभरातील बँका या दिवशी बंद राहतील.
या सुट्ट्या लक्षात घेऊन बँकांची कामे वेळीच उरकल्यास गैरसोय टाळता येईल.