वर्षाखेरीस 4 दिवस बँका बंद; नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता
बँक (Photo Credits: Twitter)

डिसेंबर (December) महिन्याच्या अखेरीस चार दिवस बँकांचे (Bank) कामकाज बंद राहणार आहे. 26 डिसेंबरला बँक कर्मचारी संघटनेने बंदची हाक दिली आहे. बँक ऑफ बडोदा, देना बँक आणि विजया बँक यांचे एकत्रीकरण होणार आहे. मात्र त्याच्या निषेधार्थ बँक कर्मचारी संघटनांनी संप पुकारला आहे. त्यामुळे चार दिवस बँका बंद राहतील.

22-23 डिसेंबर- 22 डिसेंबरला चौथा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी आहे. तर 23 डिसेंबरला रविवार असल्याने बँका बंद राहतील.

त्यानंतर 24 डिसेंबरला बँकांचे कामकाज सुरु राहील. 25 डिसेंबरला नाताळची सुट्टी असेल. तर 26 डिसेंबरला युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन या बँकेच्या कर्मचारी संघटनेने संप पुकारला आहे. त्यामुळे बँका बंद राहतील.

परिणामी चार दिवसांच्या कालावधीत नागरिकांना त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळे त्यापूर्वीच बँकांची कामे उरकून घ्या.