Akashya Tritiya 2022: अक्षय्य तृतीयेला 'या' 4 प्रकारे करा सोन्यात गुंतवणूक; तुम्हाला मिळेल भरपूर परतावा
Pure Gold | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

Akashya Tritiya 2022: अक्षय्य तृतीयेचा दिवस खरेदीपासून लग्नापर्यंत कोणत्याही नवीन सुरुवातीसाठी शुभ मानला जातो. या दिवशी लोकांना सोने खरेदी करायला आवडते. तुम्हीही आज सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही चांगले पर्याय घेऊन आलो आहोत. चला जाणून घेऊया या अक्षय्य तृतीयेला तुम्ही सोन्यात कशी गुंतवणूक करू शकता.

फिजिकल गोल्ड (Physical gold)

सोने धारण करण्याचा सर्वात पसंतीचा मार्ग म्हणजे फिजिकल गोल्ड, दागिने किंवा सोन्याची नाणी. बहुतेक भारतीय ज्वेलर्सकडे जाऊन सोने खरेदी करण्यास प्राधान्य देतात. (हेही वाचा - Gold Rates On Akshaya Tritiya: अक्षय्यतृतीया निमित्त सोने खरेदी करताय? आगोदर दर तर जाणून घ्या)

सॉवरेन गोल्ड बॉन्ड (Sovereign gold bonds)

सॉवरेन गोल्ड बॉन्ड (SGBs) हा डिजिटल सोन्यात गुंतवणूक करण्याचा उत्तम पर्याय आहे. गोल्ड बॉण्ड्समुळे व्यक्ती संपत्ती वाढीचा आनंद घेऊ शकतो आणि दरवर्षी व्याज देखील मिळवू शकतो. सॉवरेन गोल्ड बॉन्ड भारत सरकारद्वारे जारी केले जातात आणि त्यात कोणताही धोका नसतो. (Akshaya Tritiya Messages 2022: अक्षय्य तृतीया निमित्त मराठी Wishes, Wallpapers, Whatsapp Status च्या माध्यमातून शुभेच्छा देऊन साजरा करा खास दिवस!)

गोल्ड ईटीएफ (Gold ETFs)

गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETFs) 99.50 टक्के शुद्धतेच्या सोन्यात गुंतवणूक करतात. गोल्ड ईटीएफ सोन्याच्या किमतीशी जोडलेले असतात. गोल्ड ईटीएफच्या प्रत्येक युनिटला सोन्याच्या निश्चित किंमतीनुसार ग्राह्य धरले जाते. मोठ्या संख्येने लोक सॉवरेन गोल्ड बॉन्ड आणि गोल्ड ईटीएफ देखील खरेदी करत आहेत, जे कागदाच्या स्वरूपात उपलब्ध आहेत.

गोल्ड म्युच्युअल फंड (Gold mutual funds)

गोल्ड म्युच्युअल फंड हे कमोडिटी म्युच्युअल फंड आहेत. जे सोन्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे गुंतवणूक करतात. गुंतवणूकदार एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETFs) द्वारे सोन्यात गुंतवणूक करू शकतात.