Akshaya Tritiya Messages in Marathi (PC - File Image)

Akshay Tritiya Messages in Marathi : हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेच्या व्रतामध्ये तपश्चर्या, तीर्थयात्रा, व्रत आणि दान यांना खूप महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेचा दिवस शुभ कार्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. हा सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो. याला आखा तीज असेही म्हणतात. अक्षय्य तृतीयेला लक्ष्मी देवीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ असते. यावेळी 3 मे रोजी अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya)  येत आहे.

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सूर्य मेष राशीत आणि चंद्र वृषभ राशीत असतो. ही वैशाखातील शुक्ल पक्षाची तिसरी तिथी आहे, जी सहसा एप्रिल किंवा मे महिन्यात येते. असेही मानले जाते की, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सूर्य आणि चंद्र सर्वात तेजस्वी असतात. वैशाख शुक्ल पक्ष तृतीयेला अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भगवान परशुरामाचा जन्म झाला. त्यामुळे या तारखेला केलेले काम कधीही वाया जात नाही. अक्षय्य तृतीया निमित्त मराठी Wishes,Wallpapers,Whatsapp Status च्या माध्यमातून आपल्या प्रियजनांना या खास दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा -Akshay Tritiya 2022:अक्षय तृतीया कधी आहे ? जाणून घ्या हा दिवस कोणत्या राशिसाठी राजयोग बनत आहे?जाणून घ्या, महत्व, पूजा-विधि आणि शुभ मुहूर्त!)

अक्षय तृतीया मराठी शुभेच्छा (Akshay Tritiya Messages in Marathi )

ही अक्षय तृतीया तुमच्या कुटुंबाला

नवचैतन्य, सुख शांती व प्रेम देऊन जावो

हीच आमची कामना

अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा...

Akshaya Tritiya Messages in Marathi
Akshaya Tritiya Messages (PC - File Image)

आशा आहे या मंगलदिनी,

आपल्या जीवनात नवचैतन्य येवो..

येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद,

सुख, समाधान घेऊन येवो..

अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा..

Akshaya Tritiya Messages in Marathi
Akshaya Tritiya Messages in Marathi (PC - File Image)

प्रत्येक काम होवो पूर्ण..

न काही राहो अपूर्ण..

धन-धान्य आणि प्रेमाने भरलेलं असो जीवन..

घरात होवो लक्ष्मीचं आगमन..

अक्षय तृतीयेच्या सोनेरी शुभेच्छा!

Akshaya Tritiya Messages in Marathi
Akshaya Tritiya Messages in Marathi (PC - File Image)

आज अक्षय तृतीया,

साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक सुंदर मुहूर्त..!!

आपल्या आयुष्यात “अक्षय” सुख,

धनसंपदा ,मैत्री आणि आरोग्य लाभो,

हिच ईश्वर चरणी प्रार्थना..!!

माझ्या कडून तुम्हाला,

अक्षय तृतीयेच्या खुप खुप शुभेच्छा..!

आणि नेहमी प्रमाणे “सुप्रभात”

Akshaya Tritiya Messages in Marathi
Akshaya Tritiya Messages in Marathi (PC - File Image)

प्रार्थना आहे की आपणास

आणि आपल्या कुटुंबास,

ही अक्षय तृतीया सुख, समृद्धी,

आणि भरभराटीची जावो..

अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!

Akshaya Tritiya Messages in Marathi
Akshaya Tritiya Messages in Marathi (PC - File Image)

सनातन धर्मशास्त्रानुसार, अक्षय्य तृतीया सोमवारी किंवा बुधवारी रोहिणी नक्षत्रासह आली तर त्याचे महत्त्व आणखी वाढते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी व्यक्ती कोणतेही शुभ कार्य करू शकते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गंगेत स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. असं म्हणतात की, या दिवशी गंगेत स्नान केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. शास्त्रानुसार पितृ श्राद्ध अक्षय्य तृतीयेच्या दिवशीही करता येते. या दिवशी पितरांच्या नावाने दान केल्याने विशेष फळ मिळते.