Indian Railways कडून 15 पॅसेंजर रेल्वे गाड्या 12 मे पासून धावणार पहा irctc.co.in वर त्याचं E-Tickets कसं बुक कराल?
Representational Image (Photo Credits: PTI)

रेल्वे मंत्रालयाकडून काल भारतात लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्येही अंशतः प्रवासी वाहतूक पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काल (10 मे) याबाबत दिलेल्या माहितीनुसार, 12 मे पासून भारतात नवी दिल्ली येथून देशाच्या ठराविक भागामध्ये 15 गाड्यांची ये-जा सुरू केली जाणार आहे.दरम्यान भारतात 25 मार्च पासून प्रवासी वाहतूक ठप्प झाली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 15 रेल्वे गाड्यांच्या येणार्‍या जाणार्‍या अशा 30 फेर्‍या सुरू केल्या आहेत.दरम्यान आज संध्याकाळी 4 वाजल्यापासून त्याच ऑनलाईन तिकीटबुकींग आयआरसीटीसी च्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच irctc.co.in वर सुरू होणार आहे. दरम्यान या रेल्वेच्या फेर्‍या मुंबई सेंट्रल, मडगाव, अहमदाबाद, जम्मू तावी, दिब्रुगड, रांची, भुवनेश्वर, आगरतळा, हावडा, पटना, बिलासपूर,बेंगळूरू, चैन्नई, तिरूअनंतपुरम या स्थानकासाठी सुरू होणार आहे.

ऑनलाईन तिकीट बुकिंग कशी कराल?

 • आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर IRCTC account च्या मध्यमातून रजिस्टर युजर आयडी आणि पासवर्डच्या माध्यमातून लॉग ईन करा.
 • "Book your ticket" चं पेज तुमच्यासमोर येईल.
 • तुम्हांला कोठून कोठपर्यंत प्रवास करायचा आहे त्याची माहिती भरा. सोबतच प्रवासाची तारीख, कोणत्या कोचमधून प्रवास करायचा आहे त्याची योग्य निवड करा.
 • तुम्हांला कोणकोणत्या ट्रेन्सचा पर्याय आहे हे पाहण्यासाठी ‘Find trains’ चा पर्याय असेल.
 • ट्रेन निवडल्यानंतर तुम्हांला त्या ट्रेनमधील क्लास निवडा.
 • "Check availability and fare" टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हांला तिकीट दर, तिकीटांची उपलब्धता पहायला मिळेल. तुम्हांला ट्रेनचं तिकीट मिळवण्यासाठी "Book now" वर क्लिक करावं लागेल.
 • परतीचा प्रवास निवडण्यासाठी "Book Return/Onward Ticket"वर क्लिक करा.
 • त्यानंतर अत्यावश्यक माहिती भरणं गरजेचे आहे.
 • तुम्हांला बोर्डिंग स्टेशन बदलायचं असल्यास "Change Boarding Station" चा पर्याय दिसेल.
 • त्यानंतर तुम्हांला ऑनलाईन माध्यमातूनच तिकीट बुकिंगचे पैसे भरायचे आहेत. दरम्यान तुमच्या प्रवासामध्ये काही बदल झाल्यास "Replan Booking" वर क्लिक करून बदल करता येऊ शकतात.
 • तिकीटाचं बुकिंग झाल्यानंतर तुम्हांला तिकीट कन्फर्मेशन पेज दिसेल. तुम्हांला ईमेल किंवा SMS वर तुमचं e-ticket मिळेल.
 • या तिकीटाचं तुम्ही प्रिंटदेखील घेऊ शकता.

दरम्यान रेल्वेकडून काही प्रमाणात प्रवासी ट्रेन सुरू करण्यात आली असली तरीही याची तिकीट विक्री केवळ ऑनलाईन माध्यमातून करण्यात येणार आहे. देशभरात कुठेही या तिकीटांचं रेल्वे स्थानकांवर विक्री केली जाणार नाही. तसेच प्लॅटफॉर्म तिकीट देखील दिलं जाणार नाही. दरम्यान केवळ कन्फर्म तिकीट असलेल्यांनाच गाडीत प्रवेश दिला जाईल.