Indian Railways | Image used for representational purpose only | (Photo Credits: PTI)

भारतीय रेल्वेने (Indian railway) रविवारी जाहीर केलेल्या नव्या घोषणेनुसार 12 मे पासून प्रवासी रेल्वे (Passenger Train) सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. 12 मे रोजी केवळ नवी दिल्लीहून (New Delhi)  पॅसेंजर रेल्वे सुटतील, असे नोडल रेल्वे संस्थेने सांगितले आहे. 12 मे रोजी म्हणजेच मंगळवारी 15 पॅसेंजर रेल्वे धावतील.  याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी सुद्धा ट्विट च्या माध्यमातून माहिती दिली आहे. यामध्ये गोयल यांनी 12 मे पासून पॅसेंजर रेल्वे सुरु करण्यात येणार आहे असे सांगितले आहे ज्यासाठी 11 मे च्या संध्याकाळी 4 वाजल्यापासून irctc.co.in वर ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे. असेही गोयल यांनी स्पष्ट केले आहे.

प्राप्त माहितीनुसार, या रेल्वेतिकिटाचे बुकिंग स्टेशनवर करता येणार नाही. यातून होणाऱ्या गर्दीची शक्यता लक्षात घेता प्लॅटफॉर्म तिकिटांसह कोणतेही तिकीट काउंटरवर दिले जाणार नाहीत,” असे रेल्वेने सांगितले आहे. प्रवासाच्या दरम्यान प्रत्येकाने चेहरा कव्हर करणे अनिवार्य आहे, प्रवासाआधी प्रवाशांचे स्क्रीनिंग केले जाईल असे रेल्वेने जाहीर केलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

पियुष गोयल ट्विट

12 मे रोजी सुरु होणाऱ्या ट्रेनच्या 15 फेऱ्या या डिब्रूगढ़, अगरतला, हावड़ा, पटना, बिलासपुर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगळुरू, चेन्नई, तिरुवनंतपुरम, मडगांव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मू तवी अशा गंतव्य ठिकाणी जाणार आहे.

पहा ट्विट

दरम्यान, देशात जनता कर्फ्यू लागू करण्यात आल्यापाससून म्हणजेच 22 मार्चपासून रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. यानंतर थेट 25 मार्चपासून देशभरात लॉकडाउन लादण्यात आला ज्यामध्ये सर्व प्रकारच्या सार्वजनिक वाहतुक बंद करण्यात आली.

मध्यंतरी परराज्यात अडकलेल्या प्रवाशांसाठी श्रमिक स्पेशल ट्रेन सुरु करण्यात आल्या होत्या. आता हळूहळू ही स्थिती पूर्ववत करण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. यासाठी सर्व प्रकारची खबरदारी घेणे प्रवासी व कर्मचारी यांना अनिवार्य असणार आहे.