Income Tax Return File | (Images for symbolic purposes only । Photo Credits: pixabay)

Income Tax Return File: तुम्ही जर 2019 या वर्षाला निरोप देऊन 2020 या वर्षाचे धमाकेदार स्वागत करु इच्छीत असाल तर, 31 डिसेंबर हा दिवस गांभीर्याने ध्यानात ठेवा. अन्यथा तुम्हाला मोठा आर्थिक भुर्दंड बसेल. होय, या वर्षाची (2019) इनकम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारखी 31 डिसेंबर 2019 अशी आहे. सुरुवातीला आयटीआरची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2019 अशी होती. मात्र, त्यास मूदतवाढ देत ती 31 डिसेंबर 2019 अशी वाढविण्यात आली. त्यामुळे यंदाची आयटी रिटर्न (Income Tax Return File) भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर अशी असून, ती जर ओलांडली तर करदात्याला दंडापोटी मोठी रक्कम भरावी लागू शकते.

सन 2017-18 चा अर्थसंकल्प सादर करताना केंद्र सरकारने स्पष्ट केले होते की, इनकम टॅक्स विभाग सेक्शन 234F अनुसार आर्थिक वर्ष 2017-18 (असेसमेंट इयर 2018-19) पासून इनकम टॅक्स रिटर्न डेडलाईन ओलांडल्यानंतर तो भरण्यासाठी करदात्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल.

दरम्यान, आपणही जर सरकारने दिलेल्या मुदतीत म्हणजेच 31 डिसेंबर 2019 पूर्वी जर इनकम टॅक्स भरत असाल तर, आपल्याल 5000 रुपये इतकी रक्कम भरावी लागेल. अन्यथा तुम्ही जर 31 डिसेंबर नंतर आयटीआर फाईल जमा करत असाल आणि तो कालावधी जर 31 डिसेंबर 2019 ते 31 माक् 2020 याच्या पूर्वीचा असेल तर आपल्याला 10,000 रुपये दंडापोटी भरावे लागू शकतात.

जर आपण इनकम टॅक्स कक्षेत येत नसाल तर, आपल्याला लेट फाईन (विलंबशुल्क) भरण्याची गरज नाही. परंतू, जर आपण छोटे करदाते असून, आपली टॅक्सेबल इनकम 5 लाख रुपयांपेक्षा कमी असेन तर 1000 रुपये इतका दंड द्यावा लागू शकतो. (हेही वाचा, Income Tax: ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या इन्कम टॅक्स स्लॅबची सुविधा; जाणून घ्या कसा घ्याल लाभ)

दरम्यान, एखाद्याचे एकूण उत्पन्न किमान सवलतीपेक्षा अधिक नसेल तर, त्यांना विलंबाने रिटर्न फाईल्स करण्यासाठी कोणताही दंड आकरला जाणार नाही. आतापर्यंत बेसिक टॅक्स सवलत 2.50 लाख रुपयांची आहे. 60 वर्षांपेक्षा अधिक आणि 80 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांसाठी ही मर्यादा 3 लाख रुपये इतकी आहे. 80 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीसाठी ही मर्याता 5 लाख इतकी आहे.