Bank Holidays | Image used for representational purpose (Photo Credit: PTI)

Bank Holiday 20 May: भारतातील निवडणुकीचा पाचवा टप्पा 20 मे रोजी होणार आहे. पाचव्या टप्प्यात 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 49 लोकसभा (Lok Sabha Election 2024) जागांसाठी मतदान (Voting) होणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील 14, महाराष्ट्रातील 13, पश्चिम बंगालमधील 7, बिहारमधील 5, ओडिशातील 5, झारखंडमधील 3, जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील प्रत्येकी 1 जागांचा समावेश आहे. अशा स्थितीत सोमवारी या सर्व ठिकाणी बँका बंद राहणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात मतदान होणाऱ्या शहरांमध्ये बँका बंद राहतील, अशी अधिसूचना आरबीआयने आधीच जारी केली होती. अशा स्थितीत तुमचे एखादे काम या दरम्यान अडकले असेल तर ते शनिवारी पूर्ण करू शकता. 18 मे हा तिसरा शनिवार असल्याने या शनिवारी बँका सुरू असतात. (हेही वाचा -Navy Agniveer Recruitment: नौदलातील अग्निवीर MR, SSR भरतीसाठी आजपासून नोंदणी सुरू; उमेदवार agniveernavy.cdac.in वर करू शकतात अर्ज)

या जागांवर होणार मतदान -

  • महाराष्ट्र: धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य आणि मुंबई दक्षिण.
  • बिहार: सीतामढी, मधुबनी, मुझफ्फरपूर, सारण आणि हाजीपूर.
  • उत्तर प्रदेश: मोहनलाल गंज, लखनौ, रायबरेली, अमेठी, जालौन, झाशी, हमीरपूर, बांदा, फतेहपूर, कौशांबी, बाराबंकी, फैजाबाद, कैसरगंज आणि गोंडा.
  • ओडिशा: बारगढ, सुंदरगढ, बोलंगीर, कंधमाल आणि आस्का.
  • झारखंड: चतरा, कोडरमा आणि हजारीबाग.
  • पश्चिम बंगाल: बनगाव, बराकपूर, हावडा, उलुबेरिया, श्रीरामपूर, हुगळी आणि आरामबाग.
  • जम्मू आणि काश्मीर, बारामुल्ला, लडाख

मे महिन्यात बँकेला सुट्ट्या कधी असतील?

  • 19 मे : रविवारची सुट्टी.
  • 20 मे : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024, बेलापूर आणि मुंबईत बँका बंद राहणार आहेत.
  • 23 मे: बुद्ध पौर्णिमा सुट्टी
  • 25 मे : चौथ्या शनिवारची सुट्टी
  • 26 मे : रविवारची सुट्टी.

बँकांच्या सुट्ट्यांची यादी सर्व राज्यांमध्ये सारखी नसते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नुसार, सर्व राज्यांच्या सुट्ट्यांची यादी वेगळी आहे. या सुट्ट्यांची संपूर्ण यादी आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर दिली आहे, ज्यामध्ये राज्यांनुसार विविध सण आणि सुट्ट्यांची संपूर्ण माहिती दिली आहे. मात्र, सुट्टीच्या दिवशीही लोक ऑनलाइन बँकिंगच्या मदतीने आपली सर्व कामे पूर्ण करू शकतात.