
EPF खाताधारकाला जर कोणत्याही समस्येशिवाय पैसे काढायचे असल्यास त्यांनी आपले बँक खाते हे पीएफ खात्यासह जरुर अपडेट करावे लागणार आहे. काही वेळेस असे होते की, सब्सक्राइबर्स पीएफ खात्याला लिंक असलेले बँक अकाउंट बंद करतात किंवा नवे बँक खाते पीएफ अकाउंट लिंक करणे विसरुन जातात. त्यामुळे बँक खात्याची माहिती अपडेट नसेल तर पीएफ खात्यातून पैसे काढू शकत नाही. अशातच जर तुम्हाला नवे बँक खात्याची माहिती पीएफ अकाउंटसह अपडेट करणे गरजेचे आहे.
पीएफ खात्यातील रक्कम काढण्यापूर्वी त्यात किती रक्कम शिल्लक राहिली आहे ते तपासून पहा. तसेच जर तुम्ही तुमचे बँक खाते ईपीएफ खात्याला लिंक करायचे असल्यास या सोप्प्या स्टेप्स फॉलो करा.(LIC Kanyadan Policy: महिन्याला 3600 च्या प्रिमियम वर 25 वर्षांनी 27 लाख देणारी एलआयसी कन्यादान पॉलिसी पहा काय?)
- सर्वात आधी ईपीएफओ च्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.
- येथे गेल्यानंतर Manage टॅबवर क्लिक करा.
- त्यानंतर ड्रॉप डाऊन मेन्यू मध्ये KYC निवडा.
-आता बँक निवडा आणि बँक अकाउंट क्रमांक, नाव आणि IFC Code देत Save वर क्लिक करा.
-ही माहिती Approve झाल्यानंतर केवायसी सेक्शन दिसेल. या पद्धतीने बँक खात्याची माहिती ईपीएफ अकाउंटसह अपडेट होणार आहे.
तर ग्राहकांना ईपीएफ खात्यामधील आर्थिक वर्ष 2019-20 चे व्याज क्रेडिट करण्यास सुरुवात केली आहे. कोविड19 ची परिस्थिती जरी असली तरीही ईपीएफओ त्यांच्या ग्राहकांना 8.5 टक्के दराने व्याज देत आहे. यामुळे सहा कोटी ग्राहकांना ईपीएफओचा फायदा होणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला पीएफ खात्यामधील किती रक्कम जमा झालीय हे घरबसल्या तपासून पाहता येणार आहे.