Sukanya Samriddhi Yojana (Photo Credits: File Photo)

मुलीच्या भविष्याची प्रत्येक आई-वडीलांना काळजी असते. त्यामुळे तिच्या उज्ज्वल भवितव्यासाठी योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्यावर पालकांचा भर असतो. त्यापैकी एक म्हणजे सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana). या योजनेत गुंतवणूक केल्याने मुलीचे शिक्षण, लग्न याची आर्थिक चिंता वाटत नाही. सरकारच्या या योजनेला सामान्य व्यक्तींकडून भरगोस प्रतिसाद मिळतो. परंतु, काही वेळेस त्यात पैसे गुंतवणे शक्य होत नाही. त्यामुळे खाते बंद पडते. अशा वेळी चिंता करु नका. हे खाते तुम्ही पुन्हा सुरु करु शकता. (Investment Tips for Your Child: लहान मुलांच्या उत्तम भविष्यासाठी 'या' पद्धतीने करा गुंतवणूक)

पोस्ट ऑफिसच्या सुकन्या समृद्धी योजनेचे खाते तुम्ही अगदी सहजपणे पुन्हा सुरू करू शकता. सुकन्या योजनेचे खाते उघडण्यासाठी मुलीच्या पालकांनी केवळ 250 रुपये भरावे लागतात. हे खाते सक्रिय ठेवण्यासाठी, दर वर्षी समान रक्कम भरावी लागेल. परंतु, पैसे जमा केले नाहीत तर आपले खाते डीफॉल्ट म्हणून घोषित केले जाते. अशा परिस्थितीत, खाते पुन्हा सुरु करू इच्छित असल्यास नंतर काही गोष्टींचे योग्यरीत्या पालन केल्यास तुम्ही ते अॅक्टीव्ह करू शकता. यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिस किंवा बँकेत भेट द्यावी लागेल. तेथे पुन्हा खाते उघडण्याशी संबंधित फॉर्म भरावा लागेल. तेव्हा शिल्लक असलेली रक्कम जमा करा. (सुकन्या समृद्धि योजनेच्या नियमात सरकारकडून बदल, जाणून घ्या)

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वर्षांमध्ये आपण पैसे भरलेले नाही त्या वर्षांची भर घालून आपल्याला दरवर्षी किमान 250 रुपये द्यावे लागतील. या पेमेंटसाठी तुम्हाला दरवर्षी दंड म्हणून 50 रुपये द्यावे लागतील. त्यानंतर आपले खाते त्वरित सुरू होईल आणि त्यानंतर तुम्ही अगदी सजह या खात्यात पैसे देण्यास भरु शकाल.