केंद्र सरकारने सुकन्या समृद्धि योजने (Sukanya Samriddhi Yojana) मधील काही नियमात बदल केले आहेत. 12 डिसेंबरला एक नोटिस जाहीर करत याबाबत अधिक माहिती दिली आहे. त्यानुसार एखाद्या व्यक्तीला 10 वर्षाखालील मुलीचे समृद्धी योजनेअंतर्गत खाते सुरु करता येणार आहे. कोणत्याही एकाच्या नावे खाते सुरु करता येते. हे खाते सुरु करण्यासाठी जन्माचा दाखला आणि अन्य महत्वाचे कागदपत्र सादर करावे लागणार आहेत. तसेच एका व्यक्तीकडून दोन मुलींसाठी खाते सुरु करता येणार आहे. परंतु तर एखाद्या परिवारात जुडवा मुली असतील तर त्यांना दोन पेक्षा अधिक खाते सुरु करण्याची सुविधा लागू आहे.
एका आर्थिक वर्षाच्या दरम्यान सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत सुरु करण्यात आलेल्या खात्यामध्ये 1.5 लाख रुपयापर्यंत रक्कम जमा करु शकता. तसेच कमीत कमी 250 रुपये तुम्ही या खात्यामध्ये जमा करु शकता. मात्र एखाद्या व्यक्तीने 1.5 लाखांपेक्षा अधिक रक्कम खात्यात भरल्यास त्याला व्याजाच्या लिस्टमध्ये गणले जाणार नाही. तसेच खात्यात भरलेली रक्कम त्या व्यक्तीला परत केली जाणार आहे. या खात्यात 15 वर्षापर्यंत पैसे जमा करण्याची सुविधा उपलब्ध आहे.(PPF मध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी खबर, पैसे काढण्यासंदर्भातील नियमात बदल)
सध्या सरकारकडून सुकन्या समृद्धी योजने मधील खातेधारकांना 8.40 टक्क्यांनी व्याज देऊ करत आहे. या व्याजाची रक्कम प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपासून ते शेवटच्या तारखेपर्यंतच्या कमीत कमी रक्कमेनुसार ठरवली जाणार आहे. प्रत्येक आर्थिक वर्षानंतर खात्यात व्याज जमा होणार आहे. तर मुलगी ज्या वेळेस 18 वर्षाची होईल त्यानंतर तिने जरी महत्वाचे कागदपत्र सादर करुन तिचे खाते पुढे सुरु ठेवू शकते. 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर खाते बंद करु शकतात. यासाठी खातेधारकाला एक अॅप्लीकिकेशन द्यावे लागणार आहे. त्याचसोबत स्टॅम्प पेपरसह डिक्लेरेशन सहीसह वयाचा दाखला सुद्धा देणे अनिवार्य आहे.