Investment Tips for Your Child: लहान मुलांच्या उत्तम भविष्यासाठी 'या' पद्धतीने करा गुंतवणूक
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Pixabay/PTI)

Investment Tips for Your Child:  सध्याच्या घडीला योग्य प्लॅनिंग महत्वाचे आहे. खासकरुन जर तुम्ही गुंतवणूक करत असल्यास त्यावेळी कोणतीही रिस्क घेऊ नये असे सांगितले जाते. तसेच भवितव्यासाठी गुंतवणूक करण्याबद्दल बहुतांशजण हे चिंतेत असल्याचे ही आपल्याला दिसते. परंतु तुम्ही तुमच्या मुलाच्या उज्जव भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल उत्तम प्लॅनच्या माध्यमातून ती करु शकता. याच पार्श्वभुमीवर आम्ही तुम्हाला काही उत्तम भविष्यासाठी फायदेशीर ठरतील असे काही गुंतवणूकीच्या प्लॅन बद्दल सांगणार आहोत. त्यानुसार तुम्ही मुलासाठी गुंतवणूक करु सकता. यामुळे तुम्हाला चांगले रिटर्नस ही मिळण्याची अधिक शक्यता आहे.

लक्षात असू द्या की, मार्केटमध्ये पोस्ट ऑफिसमध्ये लहान बचत योजना, फिक्स्ड डिपॉझिट, म्युचल फंड्स सारख्या ठिकाणी गुंतवणूक करण्यापूर्वी जेथे तुमचे पैसे सुरक्षित राहतील याचा विचार करुन पुढे जा. अशाच काही ऑप्शन बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही पीपीएफच्या माध्यमातून तुमच्या मुलाचे भवितव्य सुरक्षित करु शकता. येथे 18 वर्षाखालील मुलाचे पीपीएफ अकाउंट सुरु करता येते. या खात्याचे मॅच्युरिटी पिरियड 15 वर्ष असते. त्याचसोबत एका वर्षात तुम्ही 1.5 लाख रुपयेच गुंतवू शकता. 15 वर्षानंतर तुम्ही खात्यातील संपूर्ण रक्कम काढून घेऊ शकता. तसेच तुम्हाला हे अकाउंट पुढे सुद्धा सुरु ठेवायचे असल्याच तसे ही तुम्हाला करता येणार आहे.(Paytm Launches Personal Loan Service: पेटीएम अवघ्या काही मिनिटांत देणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज, लॉन्च केली पर्सनल लोन सर्विस)

जर तुम्हाला मुलगी असेल तर पोस्ट ऑफिसात सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करु शकता. या खात्यात वर्षात 250 रुपये ते अधिकाधिक दीड लाख रुपये गुंतवता येणार आहेत. या दरम्यान तुम्हाला इनकम टॅक्स मध्ये सुद्धा सूट दिली जाणार आहे. या खात्यात 15 वर्षापर्यंत गुंतवणूक करावी लागते आणि याची मॅच्युरिटी पिरियड 21 वर्ष असते. म्हणजेच 6 वर्षाचे अधिक व्याज मिळते. त्याचसोबत मॅच्युअल फंड्स मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असल्यास अधिक रिटर्न्स मिळू शकतात.