डिजिटल पेमेंट सर्विस प्लेटफॉर्म पेटीएम (Paytm) गरजू ग्राहकांसाठी तत्काळ कर्ज सेवा सुरु केली आहे. हे कर्ज पर्सनल लोन स्वरुपातील आहे. या सेवेअंतर्गत पेटीएम साधारण दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देणार आहे. पेटीएमची ही सेवा वर्षातील सर्व म्हणजेच 365 दिवस सुरु असणार आहे. याचाच अर्थ असा की सुट्टीच्या दिवशीही आपण पेटीएमच्या या सेवेचा लाभ घेऊ शकता. पेटीएमच्या नावे दिले जाणारे हे कर्ज NBFC आणि बँकांद्वारे दिले जाणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, पेटीएमच्या या सेवेद्वारे कर्ज घेताना ग्राहकाला फार काळ वाट पाहावी लागणार नाही. वर्षातल्या कोणत्याही दिवशी ग्राहक पेटीएमकडे गेला तरी त्याला 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज अवघ्या काही मिनिटींत मिळणार आहे. हे कर्ज ग्राहकाला क्रेडिट स्कोर आणि खरेदीच्या पॅटर्नच्या आधारावर मिळेल. ग्राहकाला हे कर्ज 18 ते 36 हफ्त्यांमुळे भरावे लागेल. (हेही वाचा, Paytm च्या माध्यमातून LPG Cylinder बुकिंगवर मिळणार 500 रुपयांचा कॅशबॅक, 'या' पद्धतीने लाभ घ्या)
ग्राहकांना सेवा देण्यासाोटी पेटीएमने देशातील अनेक बँकांशी आणि NBFC सोबत करार केला आहे. कंपनी आता प्लेटफॉर्म च्या माध्यमातून पर्सनल लोन सेवेचा फायदा घेण्यासाठी सुरु असलेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत 1 मिलियन पेक्षाही अधिक युजर्सपर्यंत पोहोचण्याचा विचार करत आहे.
पेटीएम एमएसएमईला 2021ंत 1000 रुपयांपर्यंतचे कर्ज देणार आहे. याशिवा पेटीएम एमएसएमईला आर्थिक मततही देत आहे. याच्या माध्यमातून कंपनीने 2021 पर्यंत 1000 कोटी रुपयांचे लोन देण्याचे ध्येय ठेवले आहे. कंपनीने ‘मर्चेंट लेडिंग प्रोग्राम’ च्या माध्यमातून पेटीएम फॉर बिजनेस अॅपवर कस्टमर्सला कोलेटरल-फ्री लोन देत आहे.