Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

7th Pay Commission: देशातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकार पुन्हा एकदा महागाई भत्त्यात (DA) वाढ करण्याचा विचार करत आहे. एआयसीपीआय (AICPI) निर्देशांकाच्या आकडेवारीवरून याबाबतची माहिती प्राप्त झाली आहे. 2023 च्या सुरुवातीला म्हणजेच नवीन वर्षातच कर्मचाऱ्यांना बंपर गिफ्ट मिळणार आहे.

AICPI निर्देशांकात वाढ -

एआयसीपीआय निर्देशांकाच्या आकडेवारीत पुन्हा एकदा जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. यावेळीही सरकार महागाई भत्त्यात 4 टक्क्यांपर्यंत वाढ करू शकते. यावेळची परिस्थिती पाहता जानेवारीतही सरकार डीएमध्ये बंपरने वाढ करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (हेही वाचा - Holiday on Netaji Subhas Chandra Bose’s Birth Anniversary: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त सुट्टीची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली)

महागाई भत्ता 42 टक्के असेल -

जानेवारी 2023 पासून कर्मचाऱ्यांना वाढीव भत्त्याचा लाभ मिळेल, परंतु सरकार मार्च 2023 पर्यंत त्याची घोषणा करू शकते. कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 4 टक्के वाढ झाल्यास तुमचा महागाई भत्ता 42 टक्के होईल.

कोणाचा पगार किती वाढणार?

किमान मूळ वेतनाबद्दल बोलायचे झाल्यास, दरमहा 720 रुपयांची वाढ होणार आहे. याशिवाय जास्तीत जास्त मूळ वेतनाबद्दल बोलायचे झाले तर या कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा 2276 रुपये असेल.

किमान पगार वाढ कॅल्क्युलेशन -

कर्मचाऱ्याचा मूळ पगार - रु. 18,000

नवीन महागाई भत्ता (42%) – 7560 रुपये प्रति महिना

आत्तापर्यंत महागाई भत्ता (38 टक्के) – 6840 रुपये प्रति महिना

महागाई भत्ता किती वाढला - 7560-6840 - 720 रुपये प्रति महिना

वार्षिक पगारात वाढ – 720X12 = रु 8640

कमाल पगार वाढ कॅल्क्युलेशन -

कर्मचार्‍यांचे मूळ वेतन – रु 56900

नवीन महागाई भत्ता (42%) – 23898 रुपये प्रति महिना

आत्तापर्यंत महागाई भत्ता (38 टक्के) – 21622 रुपये प्रति महिना

महागाई भत्ता किती वाढला - 23898-21622 - 2276 रुपये प्रति महिना

वार्षिक पगारात वाढ - 2276X12 - रु 27312

कामगार मंत्रालयाने जाहीर केली आकडेवारी -

कामगार मंत्रालयाने AICPI ची आकडेवारी जाहीर केली आहे. सप्टेंबरमध्ये हा आकडा 131.2 इतका होता. जूनच्या तुलनेत सप्टेंबर 2022 पर्यंत AICPI निर्देशांकात एकूण 2.1 टक्के वाढ झाली आहे. गेल्या महिन्याच्या ऑगस्टच्या तुलनेत 1.1 टक्क्यांनी वाढ झाली आहे.