Gold Rate Today: धनतेरस पूर्वी आजच्या दिवशी सोन्याचा मुंबई, दिल्ली सह देशातील प्रमुख शहरातील दर काय?
Gold | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

Mumbai Delhi Gold Rate Today: भारतामध्ये आजपासून दिवाळी 2020 ला सुरूवात झाली आहे. वसू बारस पासून सुरूवात झालेल्या या सणामध्ये महाराष्ट्रात उद्या धनत्रयोदशी (Dhanteras) आणि नंतर दिवाळी (Diwali), लक्ष्मी पुजन (Laxmi Pujan) आहे. या सणासुदीच्या धामधूमीमध्ये सोने खरेदीला मोठी पसंती असते. त्यामुळे आता पुन्हा सोन्याचे भाव (Gold Rate) चढे होण्यास सुरूवात झाली आहे. भारतामध्ये कोरोना संकटात कोलमडलेली अर्थव्यवस्था आता हळूहळू सावरत असली तरी सोन्याचे दर यंदा दिवाळीच्या सणामध्ये 50 हजारांच्या वर राहणार आहे. मुंबई सह भारतामध्ये तुम्ही कुठे सोनं खरेदी करत असाल तर जाणून घ्या धनतेरस म्हणजेच धनत्रयोदशीच्या पूर्वी आज भारतातील प्रमुख शहरामध्ये 24, 22 कॅरेट सोन्याचा अंदाजे दर किती आहे?  नक्की वाचा:  Sovereign Gold Bond Scheme: दिवाळी, धनतेरसच्या पार्श्वभूमीवर स्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी; सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड स्कीमच्या 8 व्या सीरीजला सुरूवात.

Good Returns, च्या दरानुसार आज मुंबईमध्ये कालच्या सोन्याच्या भावाच्या तुलनेत थोडी वाढ झाली आहे. आजचा मुंबईमध्ये प्रति तोळा म्हणजेच 10 ग्राम सोन्याचा दर हा 22 कॅरेट साठी ₹49,660 आहे तर 24 कॅरेट साठी ₹50,660 रूपये आहे. साधारण मुंबईचा दर हा महाराष्ट्रात सर्वत्र सारखाच असतो. परंतू देशातील इतर शहरात सोन्याचे दर थोडे वर-खाली आहेत. आज दिल्लीमध्ये सोन्याचे दर 24 कॅरेटसाठी 10 ग्राम साठी 53,620 रूपये तर कोलकत्ता मध्ये 52,540 रूपये आहेत.

सोन्याप्रमाणे चांदीचा दर देखील प्रतिकिलो 60 हजारांच्या वर आहे. आजचा मुंबई मधील प्रतिकिलो चांदीचा दर ₹62,700 आहे. कालच्या तुलनेत चांदी आज घसरली आहे. दिल्लीत चांदी प्रति 62,700 किलो रूपये तर कोलकत्ता मध्ये 62,700 रूपये आहे.

दरम्यान सराफा दुकानामध्ये या दरांमध्ये थोडा बदल असू शकतो. तसेच सोनेच्या दागिन्यांच्या खरेदीमध्ये घडणावळ आणि टॅक्स हा वर खर्च असतो त्यामुळे यंदा सोनं खरेदी करताना हे सारे खर्च लक्षात घेऊन खरेदीचे प्लॅन बनवा.

भारतामध्ये आता फिजिकल गोल्डची वाढती मागणी पाहता सरकारने गोल्ड बॉन्ड्स जाहीर केले आहेत. दर महिन्यात विशिष्ट दरामध्ये आणि ठराविक काळासाठी हे गोल्ड बॉन्ड्स उपलब्ध करून देले जातात. गुंतवणूक म्हणून तुम्ही सोन्याकडे पाहत असाल तर नोव्हेंबर महिन्यातील सरकारी गोल्ड बॉन्ड्सची यंदा 13 नोव्हेंबरला मुदत संपत आहे. यामध्ये तुम्ही प्रति ग्राम रूपयांमध्ये सोनं खरेदी करू शकता.