भारतीयांकडे सोनं हे कोणत्यातरी स्वरूपात असतंच. वर्षानुवर्ष सामान्यांकडून सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा उद्देश हा आर्थिक दृष्ट्या कठीण काळात पैसा उभा करण्यासाठी किंवा त्यांची आर्थिक लक्ष्य पूर्ण करण्याचा असतो. त्यामुळे आर्थिक गणितं मांडताना अनेकजण त्याचा विचार एक मजबूत आधार म्हणून करतात. आता सोनं हे पेपर गोल्ड आणि प्रत्यक्ष गोल्ड अशा दोन स्वरूपात उपलब्ध आहे. या दोन्ही प्रकारांमध्ये सोनं खरेदी करण्याचे वेगवेगळे पर्याय आहे. आजपासून दिवाळी सुरू झाली आहे. सहा दिवसांच्या या दीपोत्सवामध्ये अनेकजण सोन्याची खरेदी आवर्जुन करतात. मग तुम्हांलाही सोन्यात गुंतवणूक करायची असे तर जाणून घ्या कोणत्या सहा महत्त्वाच्या पर्यायांमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकाल?
सोन्याचे दागिने
आज भारतीय स्त्रियांप्रमाणेच पुरूषांना देखील सोनं खरेदी करण्याचं आणि दागिन्यांच्या माध्यमातून ते अंगावर मिरवणं याचा शौक आहे. तुम्हांला तशी हौस असेल तर नक्कीच सोन्याचे दागिने तुम्ही बनवू शकता. Gold, Silver Rate Today: दिवाळी पहिल्या दिवशी आज सोनं 440 रूपयांनी स्वस्त; पहा मुंबई, पुणे, नाशिक मध्ये दर काय?
गोल्ड कॉईन
सराफा दुकान, ई कॉमर्स वेबसाईट ते बॅंकांमध्ये तुम्हांला सोन्याचं नाणं खरेदी करता येऊ शकतं. सोन्याचं नाणं, बिस्कीट, वळं 24 कॅरेट शुद्ध सोन्यामध्ये घेऊ शकता. BIS standards नुसार त्यावर हॉलमार्क चा शिक्का असतो. 0.5 ते 50 ग्रामच्या वजनात सोन्याची नाणी, बिस्किटं खरेदी केली जाऊ शकतात.
गोल्ड सेव्हिंग स्किम
अनेक सराफा दुकानांमध्ये सोन्यामध्ये गुंतवणूकीसाठी दर महिन्याला किंवा एकत्र, विशिष्ट रक्कम भरण्याची सोय असते. अशाप्रकारे विविध कालावधीसाठी पैसे भरल्यानंतर त्याचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर दागिना किंवा वळ, बिस्किट घेण्याची सोय असते.
Gold exchange-traded funds
Gold exchange-traded funds च्या माध्यामातून पेपर गोल्ड मध्ये गुंतवणूक सहज केली जाऊ शकते. गोल्ड ईटीएफ हा एक गुंतवणूक फंड आहे, ज्याचा व्यापार शेअर्स प्रमाणेच स्टॉक मार्केट एक्सचेंजवर केला जातो. यामध्ये शुद्धतेमध्ये फसवणूकीचा धोका नसतो. तसेच सहजपणे ऑनलाइन खरेदी आणि विक्री केला जाऊ शकतो.
Sovereign Gold Bonds
भारत सरकारने प्रत्यक्ष सोन्याऐवजी ग्राहकांना सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी Sovereign Gold Bonds स्किम आणली आहे. आरबीआय कडून ही स्किम चालवली जाते. विशिष्ट काळासाठी सरकार ही स्किम उपलब्ध करून देते. एका सवलतीच्या दरात सोनं खरेदी करण्याची ही संधी असते.
डिजिटल गोल्ड
Paytm, PhonePe आणि Google Pay च्या माध्यमातून सोनं खरेदी केली जाऊ शकते. या माध्यमातून अगदी 1 रूपयाच्या किंमतीचं देखील सोनं खरेदी केलं जाऊ शकतं.
बार किंवा नाण्यांच्या रूपात फिजिकल गोल्ड बाळगण्याची सुरुवातीची किंमत जवळपास 10 टक्के आहे आणि ती दागिन्यांसाठी आणखी जास्त आहे. SGB आणि Gold ETF, दोन्ही पेपर-गोल्ड, किफायतशीर आहेत कारण SGB मध्ये प्रवेशाचा कोणताही खर्च नाही तर सोने ETF ची किंमत सुमारे 1 टक्के असू शकते. हे लक्षात ठेवा की गुंतवणुकीसाठी, सोन्यामध्ये एकूण पोर्टफोलिओच्या 10 टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा नसावा.