आजपासून दिवाळीची धामधूम सुरू झाली आहे. वसूबारस (Vasu baras) सणाने या सेलिब्रेशनची सुरूवात होते. हिंदू धर्मियांचा हा मोठा सण असल्याने दिवाळीच्या 5-6 दिवसात अनेक जण आपल्या सोयीनुसार सोन्या-चांदीच्या वस्तूंची खरेदी केली जाते. दिवाळीच्या पहिल्या दिवशी आज सोन्याच्या दरात थोडी घसरण पहायला मिळत आहे. आज (9 नोव्हेंबर) दिवशी सोनं (Gold Rate) 440 रूपयांनी स्वस्त झाले आहे. प्रतितोळा आज सोन्याचा दर 24 कॅरेट साठी 60,760 आहे तर चांदीचा दर हा प्रतिकिलो 73,200 रूपये नोंदवण्यात आल्याची माहिती goodreturns च्या वेबसाईट वर देण्यात आली आहे.
भारतामध्ये सोन्यामध्ये गुंतवणूकीसोबतच सोन्याचे दागिने, वस्तू घेण्याकडेही ग्राहकांचा मोठा कल असतो. महत्त्वाचे सण, वर्षातील साडेतीन शुभ मुहूर्त यावर सोनं खरेदीची रीत आहे. दरम्यान सोन्याचे दागिने खरेदी केल्यास सोन्याच्या दरावर सराफा दुकानात घडणावळ आणि जीएसटी हे अधिकचे खर्च असतात. घडणावळीचे दर प्रत्येक दुकानानुसार कमी-जास्त असू शकतात. Gold Buying Tips On Dhanteras: धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी .
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर मधील आज सोन्या-चांदीचा दर काय?
मुंबई, पुणे, नागपूर मध्ये आज 24 कॅरेट सोनं 60,760 आहे, 22 कॅरेट सोनं 55,700 आहे तर 18 कॅरेट सोनं 45,570 रूपये आहे. नाशिक मध्ये 24 कॅरेट सोनं 60,790 आहे, 22 कॅरेट सोनं 55,730 आहे तर 18 कॅरेट सोनं 45,600 रूपये आहे. तर चांदीचा दर मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक मध्ये 73200 आहे.
दागिन्यांची शुद्धता तपासण्यासाठी BIS CARE APP द्वारे तपासू शकता. इंडियन बुलियन अॅन्ड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. दागिने बनविण्यासाठी प्रामुख्याने 22 कॅरेट सोन्याचाच वापर होतो. यात काही लोक 18 कॅरेट सोन्याचाही उपयोग करतात. सोने दागिने कॅरेट अनुसार हॉल मार्कचे बनतात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिण्यांवर 999 असा शिक्का असतो. 23 कॅरेट दागिन्यावर 958, 22 कॅरेट दागिन्यावर 916, 21 कॅरेट वर 875 आणि 18 कॅरेट वर 750 लिहीलेले असते.