मास्क (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरसवर जो पर्यंत ठोस लस उपलब्ध होत नाही तो पर्यंत मास्क आणि हात धुणे हे सर्वांच्या हिताचे असून तेच आता नैसर्गिक वॅक्सिन आहे. याच दरम्यान मास्क संबंधित येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आरोग्य विशेषज्ञांनी म्हटले आहे. खरंतर काही लोकांनी अॅन्टी मास्क कॅम्पेन सुरु केले आहे. त्यामध्ये काहींनी असे म्हटले आहे की, कोरोना व्हायरस नाहीच आहे. त्यामुळे मास्क लावण्याची काहीच गरज नाही आहे. यावर आता एम्स (AIIMS) मधील चिकित्सक डॉ. नीरज निश्चल यांनी सल्ला देत अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नये असा सल्ला दिला आहे.

प्रसार भारतीने विशेष बातचीत मध्ये निश्चल यांनी असे म्हटले आहे की, कोरोना व्हायरस जेव्हा पासून आला आहे त्यावेळ पासूनच स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी मास्क अत्यंत प्रभावी साधन आहे. अशातच काही अॅन्टी मास्क कॅम्पेनमधील लोकांना असे वाटते की, मास्क घातल्याने श्वास कोंडला जातो. श्वास घेता येत नाही किंवा फ्रेश ऑक्सिजन न मिळाल्याने प्रकृती बिघडते. या सर्व अफवा आहेत. व्हायरस अद्याप अस्तित्वात असून निष्काळजीपणाने वागल्यास स्वत:सह परिवाराला सुद्धा त्यापासून धोका उद्भवू शकतो.(COVID19 Tests In Single Day: भारताने कोविड 19 च्या दैनंदिन चाचण्यांमध्ये आज नवीन उच्चांक; एकाचं दिवसात 9,18,470 चाचण्या)

सोशल मीडियात फक्त मास्क नव्हे तर विशेषज्ञांनी असे सुद्धा म्हटले आहे की, सप्टेंबर महिन्यापर्यंत कोरोनाचा नायनाट होणार असल्याची अफवा आहे. याबद्दल निश्चल यांनी म्हटले की, सोशल मीडियातील कोणत्याही प्लॅटफॉर्मवर विश्वास ठेवू नये. त्यामुळे जर तुम्हाला एखादी माहिती हवी असल्यास शासकीय संकेतस्थळाला भेट द्या. एम्स, आयसीएमआर, आरोग्य मंत्रालय यांच्या संकेतस्थळावर योग्य माहिती उपलब्ध आहे. तुम्ही प्रसार भारतीच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवरुन सुद्धा विश्वासनीय माहिती मिळवू शकता. कोरोना व्हायरस कधी संपुष्टात येईल याबद्दल कोणतीच अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

कोरोना व्हायरसपासून नागरिकांचे जीवन वाचवण्यासाठी फ्रंट लाईन वर्कर्स प्रयत्न करत आहेत. तर कोरोनामुळे झालेल्या मृतांबद्दल बोलायचे झाल्यास भारतात येण्यापूर्वी कोरोनाचे जाळे सर्वत्र जगभरातील विविध देशात पसरले होते. केंद्र सरकारने जेव्हा लॉकडाऊन जाहीर केला त्याच दरम्यान आम्ही खुप काही दुसऱ्या देशांकडून शिकलो. ज्या प्रमाणे निष्काळजीपणामुळे दुसऱ्या देशात कोरोनामुळे बळी जात आहेत तशी चुकी आपल्या देशाने केली नाही. त्याचसोबत रोगप्रतिकारक शक्ती बद्दल असे सांगितले जाते ते सुद्धा एक कारण असू शकते. आपल्याला आता व्हायरस बद्दल समजले असून तो कसा प्रतिसाद देतो ते सुद्धा कळले आहे. याच आधारावर आता रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. (भारतामधील फार्मा कंपनी Dr Reddy’s Laboratories ने लॉन्च केले कोरोना व्हायरसचे औषध Avigan; 42 शहरांमध्ये मोफत होम डिलिव्हरी सुरु, जाणून घ्या कुठे कराल ऑर्डर)

याच दरम्यान, कोरोनामुळे बरे झालेल्यांवर त्याचा प्रभाव आणि पूर्णपणे बरे होण्याचा कालावधी याबद्दल त्यांनी म्हटले की, रुग्णांची प्रकृती पूर्णपणे सुधारल्यानंतर त्यांना डिस्चार्ज दिला जात आहे. परंतु ज्या लोकांना गंभीर स्वरुपात लक्षणे आहेत त्यांच्यासाठी काही वेळ लागत आहे. काही जणांनी कोरोनावर मात केल्यानंतर सुद्धा त्यांना समस्या उद्भवल्या आहेत. अशातच लोक पूर्णपणे कधी बरे होतील याचा काही नेम नाही आहे. कोविडच्या वॉर्डात अधिक काळ घालवल्यास मानसिक प्रभाव पडत असून त्यामधून बाहेर येण्यासाठी सुद्धा वेळ लागू शकतो.