पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात रविवारी दुपारी एक दुःखद घटना घडली. या ठिकाणी तळेगाव दाभाडे जवळील लोकप्रिय वीकेंड डेस्टिनेशन असलेल्या कुंडमळा येथे, इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळला. यावेळी अनेक पर्यंटक इंद्रायणी नदीमध्ये बुडाले असून, 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्राथमिक अहवालांनुसार, वीकेंड गर्दीमुळे पुलावर जास्त भार होता, ज्यामुळे पूल कोसळला. पूल कोसळला त्यावेळी त्यावर 30 ते 35 पर्यटक उभे असल्याची माहिती आहे. पूल कोसळल्यानंतर अनेक लोक बुडाल्याची भीती आहे, परंतु अद्याप जीवितहानीबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या घटनेनंतर, स्थानिक पोलीस, आपत्ती प्रतिसाद पथके आणि ग्रामस्थांच्या पथकांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले.
गेल्या दोन दिवसांपासून या भागात मुसळधार पाऊस पडत आहे, ज्यामुळे इंद्रायणीच्या पाण्याची पातळी आणि प्रवाहात लक्षणीय वाढ झाली आहे. दुपारी साधारण 3.30 वाजण्याच्या सुमारास पूल कोसळल्याची माहिती समोर आली. पूल कोसळल्याने त्या पुलावर उपस्थित असलेले पर्यटक खाली पडले आणि इंद्रायणी नदीत पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने हे पर्यटक वाहून गेल्याचे सांगितले जात आहे. हा कोसळलेला पूल अनेक दशके जुना असल्याचे वृत्त आहे. कुंदमळा परिसरात येणाऱ्या पर्यटकांसाठी आणि यात्रेकरूंसाठी, विशेषतः वीकेंड आणि उत्सवाच्या दिवसांमध्ये, पादचारी मार्ग म्हणून त्याचा वापर होत होता. याबाबत आमदार सुनील शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा फॅब्रिकेटेड ब्रिज होता. काही लोकांनी त्यावरुन टू व्हिलर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस ओव्हरलोड झाल्याने मधला भाग खचला. (हेही वाचा; Pune Fire: पुण्यातील चिंचवड येथील भंगार दुकान आणि फर्निचरच्या गोदामात भीषण आग (Video))
इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळला:
#BreakingNews | पुणे जिल्हयातल्या मावळ तालुक्यातल्या कुंडमळा इथं इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत २५ ते ३० पर्यटक नदीत बुडाल्याची भीती. #Pune #Maharashtra pic.twitter.com/ZCjHzdi7Zz
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) June 15, 2025
महाराष्ट्र | पुणे में इंद्रायणी नदी पर बना पुल का हिस्सा गिरा, 15-20 लोगों के बहने की खबर#Maharashtra #BridgeCollapse #BreakingNews #Pune pic.twitter.com/Q0QmbHVS29
— Vistaar News (@VistaarNews) June 15, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)