Goat | Image only representative purpose (Photo credit: pixabay)

बकऱ्याच्या डोळा एखाद्या माणसाच्या मृत्यूचे कारण ठरू शकेल यावर आपण विश्वास ठेवाल काय? नाही ना? आमचाही बसला नव्हता. पण खरोखरच असे घडले आहे. घटना आहे छत्तीसड (Chhattisgarh) राज्यातील. या राज्यातील सूरजपूर जिल्ह्यातील बगर साई या ५० वर्षीय व्यक्तीने मनोकामना पूर्ण झाल्यास देवाला बकरे कापायचा नवस बोलला. नगर साई हा मदनपुर गावचा रहिवासी आहे. योगायोग असा की, त्याची मनोकामना पूर्ण झाली. त्याचा आनंद गगनात मावेना. मग त्याने आपला नवस पूर्ण करण्याचे ठरवले आणि नेमके हे नवसच त्याच्या जीवावर बेतले.

त्याचे झाले असे की, नवस पूर्ण करण्यासाठी त्याने बकरा आणला. आता तो कापायचा. नैवेद्य दाखवायचा आणि मटणावर चांगलाच ताव मारायचात्याचा विचार. त्यानुसार त्याने आपल्या पाव्हण्या रावळ्याना सांगावा धाडला. झाले. मिळालेल्या संगाव्यानुसार पावणे, रावळे, मित्र, आप्तेष्ट सगळे मदनपूर येथील खोपा येथे पोहोचले.

सर्व विधी पूर्ण केला आणि बकऱ्याचा बळी दिला. थोड्या वेळातच बकऱ्याचे मटण शिजले. जेवणाचा मंद सुगंध वातावरणात दरवळत होता. सर्वजण जेवण करण्यासाठी बसले. पाने वाढली गेली. मटणाचा रस्सा आणि तुकडे यांनी पानं भरून गेली.

सर्वांनीच जेवणावर ताव मारायला सुरुवात केली. सहाजिक बागर यानेही ताव मारायला सुरुवात केली. दरम्यान ताटात वाढलेला बकऱ्याचा डोळा त्याच्या हाताला लागला. त्याने आता हा डोळा मिटक्या मारीत खायचा हा विचार करून तोंडात टाकला. नेमका इथेच घात झाला. डोळा त्याच्या घशात अडकला.

बकऱ्याचा डोळा घशात अडकल्याने बागरचा श्वास कोंडला.जीव गुदमरल्याने बागर कासावीस झाला. तडफडू लागला. सोबतच्या लोकांनी जेवण थांबवले. त्याला प्राथमिक उपचार केले. पण तो अधिकच कासावीस झाल्याने. त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. बकऱ्याच्या डोळ्याने बागर याचा मृत्यू झाला. इंडिया टुडे ने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान, घडल्या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. लोकं अनेक तर्कितर्क व्यक्त करु लागले आहेत. काहींनी याकडे देवाचा कोप म्हणून पाहिले आहे तर काही विज्ञानिष्ठ लोक हा केवळ एक अपघात असल्याचे म्हणत आहेत.