(Photo credit: archived, edited, representative image)

सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया (Central Bank of India) कडून 192 पदांसाठी Officers in Specialist Category साठी नोकरभरती होणार आहे. ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करण्याकरिता इच्छा आहे त्यांना centralbankofindia.co.in या बॅंकेच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. 19 नोव्हेंबर ही अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख आहे. 192 पदांपैकी प्रत्येकी एक पोस्ट ही Information Technology scale V, Risk Manager scale V आणि Librarian scale I साठी आहे. 5 जागा या Financial Analyst Scale III, 73 जागा Information Technology Scale II, 15 जागा Law Officer Scale II,50 जागा Credit Officer Scale II,4 जागा Financial Analyst Scale II, 3 जागा CA –Finance & Accounts/ GST/Ind AS/ Balance Sheet /Taxation scale II साठी आहेत.

15 जागा या Information Technology Scale I, Security Officer Scale I,आणि 2 जागा Risk Manager Scale I साठी अधिकच्या आहेत. या पदांवर निवड होण्यासाठी उमेदवारांना एक ऑनलाईन लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. डिसेंबर महिन्याच्या तिसर्‍या किंवा चौथ्या आठवड्यात होणार आहे. इथे पहा Central Bank of India Recruitment 2023 नोटिफिकेशन .

Central Bank of India Recruitment 2023 च्या परीक्षांच्या अर्जासाठी महिला, दिव्यांग, ST, SC उमेदवारांना  175 रूपये आणि GSTअसे शुल्क आहे. तर जनरल कॅटेगरीमधील उमेदवारांना 850 रूपये फी आणि जीएसटी असे शुल्क आकारले जाईल. पात्रता निकष जाणून घेण्यासाठी तुम्ही वेबसाईट वर दिलेले सविस्तर तपशील तपासून पाहू शकाल.