बॅंक ऑफ इंडिया (Bank Of India) कडून ऑफिसर पोस्ट (Officer Posts) साठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले आहे. दरम्यान संबंधित उमेदवारांना बॅंक ऑफ़ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजे bankofindia.co.in वर आपला अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीरातीनुसार, उमेदवारांना 21 डिसेंबर 2020 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. ही नोकरभरती 20 पदांसाठी असेल. दरम्यान या ऑफ़िसर पदासाठी नेमकी पात्रता निष्कर्ष, वयोमर्यादा काय आहे? हे जाणून घेण्यासाठी खालील माहिती नक्की वाचा. IOCL Recruitment 2020: इंडियन ऑइलमध्ये 400 हून अधिक जागांसाठी नोकर भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रियेसंबंधित अधिक माहिती.
बॅंक ऑफ इंडिया नोकरभरती
अर्ज कुठे कराल - bankofindia.co.in
अर्ज करण्याची अंतिम मुदत - 21 डिसेंबर 2020
नोकरभरती पदसंख्या - सिक्युरिटी ऑफिसर 20, फायर ऑफिसर 01
वयोमर्यादा - सिक्युरिटी ऑफिसरसाठी 25 ते 40 वर्ष तर फायर ऑफिसरसाठी 25 ते 35 वर्ष
प्रवेश शुल्क - एससी, एसटी 175 रूपये तर जनरल आणि वर्गासाठी 850 रूपये
दरम्यान सिक्युरिटी ऑफिसरसाठी अर्ज करणार्या व्यक्तीसाठी किमान पदवीधर असणं आवश्यक आहे. कम्युटर कोर्समध्ये किमान 3 महिन्यांसाठी सर्टिफिकेशन आवश्यक आहे. किंवा इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा संबंधित पेपरशी निगडीत आवश्यक आहे. फायर ऑफिसरसाठी बी ई फायर इंजिनियरिंग असणं आवश्यक आहे. इथे पहा नोटीफिकेशन.
उमेदवारांची निवड मुलाखती द्वारा केली जाणार आहे. यासाठी 100 मार्कांची फेरी असेल.यानुसार SC / ST / OBC / EWS / GEN category ची मेरीट लिस्ट जाहीर केली जाईल.