IOCL Recruitment 2020: इंडियन ऑइलमध्ये 400 हून अधिक जागांसाठी नोकर भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रियेसंबंधित अधिक माहिती
Indian Oil (Photo Credits-Facebook)

IOCL Recruitment 2020: जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. कारण इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकर भरती केली जाणार आहे. याबद्दल कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर अधिक माहिती मिळणार आहेच. पण नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना येत्या 23 नोव्हेंबर पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 डिसेंबर 2020 दिली गेली आहे.(Indian Army Recruitment 2020: भारतीय सैन्य दलात टेक्निकल एंट्री कोर्ससाठी अर्ज करण्यासाठी बुधवारी अंतिम तारीख; joinindianarmy.nic.in वर करा Apply)

इंडियन ऑइलमध्ये अप्रेसिंग पदासाठी नोकर भरती केली जाणार आहे. त्यानुसार 436 रिक्त पदांवर योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या नोकर भरती अंतर्गत विविध ट्रेड्ससाठी काही शैक्षणिक योग्यतेची अट घालण्यात आली आहे. उमेदवाराचे वय कमीतकमी 18 ते 24 वर्षादरम्यान असावे. तर अनुसूचित जाती आणि जमातींसाठी वयामध्ये सूट दिली जाणार आहे. नोकर संधीबद्दल येथे अधिक जाणून घ्या.(पेन्शनधारकांना आता Life Certificate घरबसल्या देखील मिळणार; जाणून घ्या 31 डिसेंबरपूर्वी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शुल्क किती, आवश्यक कागदपत्रं कोणती?)

महत्वपूर्ण तारखा-

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख- 23 नोव्हेंबर 2020

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख- 19 डिसेंबर 2020

प्रवेश पत्र जाहीर होण्याची तारीख- 22 डिसेंबर 2020

लेखी परीक्षा तारीख- 3 जानेवारी 2021

अप्रेसिंग ट्रेनिंगचा कालावधी-

ट्रेड अप्रेसिंग अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटिंग आणि ट्रेड अप्रेंटिस-डेटा एन्ट्री ऑपरेटरसाठी 15 महिनेसांठी ट्रेनिंग असणार आहे. अन्य विषयांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना 12 महिन्यांसाठी ट्रेनिंग दिली जाणार आहे.

IOCL मध्ये या पदासांठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारवरुन केली जाणार आहे. परीक्षेत MCQs प्रश्न विचारले जाणार आहेत. या पदांवर नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट iocl.com वर ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे.