Indian Army Recruitment 2020: भारतीय सैन्य दलात टेक्निकल एंट्री कोर्ससाठी अर्ज करण्यासाठी बुधवारी अंतिम तारीख; joinindianarmy.nic.in वर करा Apply
Indian Army (Photo Credits- PTI)

Indian Army Recruitment 2020: भारतीय लष्कराच्या टेक्निकल कॉर्प्समध्ये भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची सूचना आहे. भारतीय लष्कराद्वारे एप्रिल 2021 पासून सुरू होणाऱ्या 56 व्या लघु सेवा आयोग (तांत्रिक) मुख्य कोर्स आणि 27 व्या लघु सेवा आयोग (तांत्रिक) महिला कोर्ससाठी बुधवारी अर्जाचा शेवटचा दिवस आहे. हे दोन्ही अभ्यासक्रम तामिळनाडूच्या चेन्नई, ऑफिसर ट्रेनिंग अॅकॅडमी (ओटीए) येथे सुरू होणार आहेत. सैन्याच्या तांत्रिक शाखांमध्ये प्रवेश घेऊ इच्छित पात्र उमेदवार भारतीय सैन्याच्या भर्ती पोर्टल, joinindianarmy.nic.in येथे भेट देऊन अर्ज करू शकतात. यासाठी उमेदवारांना खालील पात्रतेची पूर्तता करावी लागणार आहे. खालील पात्रता असणाऱ्या उमेदवारांना सैन्याच्या तांत्रिक शाखेत प्रवेश घेता येणार आहे. (हेही वाचा - MHT CET Result 2020 Date Confirmed: एमएचटी सीईटी चा निकाल 'या' दिवशी होणार घोषित, विद्यार्थ्यांना mahacet.org. वर पाहता येणार रिजल्ट)

पात्रता निकष -

मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केलेले उमेदवार आर्मी 56 व्या एसएससी पुरुष आणि 27 व्या एसएससी महिला कोर्ससाठी अर्ज करू शकतात. अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाचे अंतिम वर्षाचे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात. तथापि, अशा उमेदवारांना 1 एप्रिल 2021 पर्यंत पदवी पास करावी लागेल आणि कोर्स सुरू झाल्याच्या 12 आठवड्यांच्या आत ओटीए, चेन्नई येथे अभियांत्रिकी पदवी प्रमाणपत्र सादर करावे लागेल. तसेच 1 एप्रिल 2021 रोजी उमेदवार किमान 21 वर्षे आणि जास्तीत जास्त 27 वर्षे वयाचा असावा.

दरम्यान, आर्मी 56 व्या एसएससी पुरुष आणि 27 व्या एसएससी महिला कोर्ससाठी एकूण 191 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. 56 व्या लघु सेवा आयोग (तांत्रिक) मुख्य कोर्समध्ये एकूण 175 जागा रिक्त आहेत आणि 27 व्या लघु सेवा आयोग (तांत्रिक) महिला कोर्समध्ये एकूण 14 जागा रिक्त आहेत. याशिवाय डिफेंस पर्सोनेलमध्ये विधवासाठी दोन जागा रिक्त आहेत.