स्टेट कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र यांच्याकडून MHT CET 2020 चे निकाल येत्या 28 नोव्हेंबर 2020 ला किंवा त्याआधी घोषित केले जाणार असल्याचे जाहीर केले आहे. या संबंधित एक नोटिस सुद्धा अधिकृत वेबसाइटवर पोस्ट केली आहे. या व्यतिरिक्त महाराष्ट्र एन्ट्रन्स टेस्ट सेल 10 नोव्हेंबरला प्रतिसाद पत्रक, एमएचटी सीईटी 2020 उत्तर आणि प्रश्नपत्रिका जाहीर करणार आहे. तर परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली होती त्यांना आपले प्रतिक्रिया पत्र (Response Sheets) आणि अधिकृत एमएचटी सीईटी Answer Keys सुद्धा अधिकृत वेबसाइट mahacet.org वर पाहता येणार आहे.(NIFT Registration Form 2020: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन लवकरचं शैक्षणिक वर्ष 2020-2021 साठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करणार)
या व्यतिरिक्त राज्य CET सेल उमेदवारांना MHT CET प्रतिक्रिया पत्रक किंवा MHT CET च्या Answer Keys च्या विरोधात 10 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर दरम्यान तक्रार दाखल करण्याची परवानगी देणार आहे.(Guidelines On Reopening Universities, Colleges: देशातील विद्यापीठे आणि महाविद्यालये सुरु करण्यासाठी UGC ने जारी केली मार्गदर्शक तत्वे; 50 टक्केच विद्यार्थी राहतील उपस्थित)
जवळजवळ 4.35 लाख महाराष्ट्रातील (Physics), रसायन विज्ञान (Chemistry), गणित (Maths) (पीसीएम) और भौतिकी (Physics) रसायन विज्ञान (Chemistry), जीवविज्ञान (Biology) (पीसीबी) च्या कॉम्बिनेशनमध्ये एमएचटी सीईटीसाठी नोंदणी केली आहे. MHT CET 2020 परीक्षा यापूर्वी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पार पडणार होती. एमएचटी स्टेट सीईटी सेल ला पीसीएम आणि पीसीबी विद्यार्थ्यांसाठी एमएचटी सीईटीचे संचालन करायचे होते. मात्र मुंबईत वीज पुरवठा खंडीत आणि अतिवृष्टीच्या कारणास्तव प्रस्तावित तारखांच्या दिवसी परीक्षा घेता आल्या नाहीत. MHT CET चे निकाल 2020 सर्व सत्रासाठी एकत्र जाहीर केले जाईल.