National Institute of Fashion Technology (PC - PTI)

NIFT Registration Form 2020: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (National Institute of Fashion Technology) लवकरचं शैक्षणिक सत्र 2020-2021 साठी NIFT 2021 अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. यासाठी अधिकृत पोर्टल https://nift.ac.in/ वर अर्ज जारी करण्यात येतील. या अभ्यासक्रमासाठी अर्ज करू इच्छित कोणताही विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने आपली नोंदणी करू शकतो. ताज्या माहितीनुसार, संस्था जानेवारीच्या तिसर्‍या आठवड्यात NIFT 2021 ची पेन आणि पेपर पद्धतीने परीक्षा घेईल. ही परीक्षा देशभरातील 32 शहरांमध्ये घेण्यात येणार आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनतर्फे घेण्यात येणाऱ्या NIFT ची प्रवेश परीक्षा ही राष्ट्रीय स्तरावरील घेण्यात येणारी परीक्षा आहे. यासंदर्भातील अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत पोर्टलला भेट देऊ शकतात.

NIFT Registration Form संदर्भातील 'या' तारखा लक्षात ठेवा -

अर्ज भरण्याची तारीख - लवकरचं जाहीर करण्यात येईल.

परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणीची अंतिम तारीख - जानेवारीचा चौथा आठवडा (हेही वाचा - UPSC Preliminary Exam 2020 चा निकाल जाहीर; Main Exam साठी 28 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर पर्यंत अर्ज भरण्याची मूदत)

NIFT Registration साठी ही कागदपत्रे तयार ठेवा -

वैध ईमेल आयडी आणि मोबाइल क्रमांक

पात्रता परीक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र

लागू असल्यास ओबीसी प्रमाणपत्र

ओबीसी प्रमाणपत्र, लागू असल्यास

लागू असल्यास एससी / एसटी प्रमाणपत्र

PWD प्रमाणपत्र, लागू असल्यास

क्रेडिट / डेबिट कार्ड आणि नेट बँकिंग तपशील

खालील पद्धीतीने भरा NIFT Registration अर्ज -

NIFT अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी प्रथम नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन (एनआयडी) च्या अधिकृत संकेतस्थळावर https://nift.ac.in/ ला भेट द्यावी. यानंतर येथे आवश्यक तपशील भरा आणि नोंदणी करा. त्यानंतर होमपेज वर दिलेल्या लॉगिन लिंकवर टॅप करा. येथे क्रेडेन्शियल्स प्रविष्ट करा आणि लॉग इन करा. यानंतर सबमिट बटणावर एंटर करा. यानंतर आपला अर्ज भरा. यात आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि स्कॅन स्वाक्षरी फोटो एकत्रीत अपलोड करा. यानंतर परीक्षेची फी सबमिट करा. फी जमा केल्यानंतर, त्याचे प्रिंटआउट घ्या आणि याची एक प्रत तुमच्याकडे ठेवा.