Mumbai-Ahmedabad Bullet Train: देशात अरबी समुद्राच्या (Arabian Sea) आतमधून बुलेट ट्रेन (Bullet Train) धावणार आहे. यासाठी आता अरबी समुद्रात बोगदा बांधण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. बुलेट ट्रेन धावण्यासाठी अरबी समुद्रात 21 किलोमीटर लांबीचा बोगदा बांधण्यात येणार आहे. समुद्रात बोगदा बांधण्यासाठी खोदकाम करणे अत्यंत अवघड असून, ही अडचण दूर करण्यासाठी बोरिंग मशीनच्या सहाय्याने खोदकाम करण्याची तयारी करण्यात आली आहे.
मुंबई ते अहमदाबाद (Mumbai-Ahmedabad) दरम्यान बांधल्या जाणाऱ्या बुलेट ट्रेन कॉरिडॉरसाठी अरबी समुद्रातील हा बोगदा तयार केला जात आहे. हा बोगदा समुद्राच्या 7 किलोमीटर खोलीवर बांधला जात आहे. बुलेट ट्रेनसाठी हा कॉरिडॉर 21 किलोमीटर लांबीचा असेल. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स ते शिळफाटापर्यंत या बोगद्याचं अंतर असणार आहे. (हेही वाचा - मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प नेमका काय आहे? त्याला विरोध का? खर्च, जमीन आणि कर्ज घ्या जाणून)
काय आहे या बोगद्याची खासियत?
हा बोगदा मेट्रो ट्रेनच्या बोगद्यापेक्षा वेगळा आहे. कारण तो समुद्रात खोलवर बांधला जात आहे. मेट्रो ट्रेनसाठी बांधण्यात येत असलेल्या बोगद्यात 5 मीटर व्यासाचा कटर असलेला टीबीएम वापरण्यात येतो. हा बोगदा खोदण्यासाठी 131 मीटर व्यासाचा टीबीएम समुद्राखालील वापरण्यात येणार आहे. याशिवाय, 16 किलोमीटरपर्यंत हा बोगदा खोदण्यासाठी 3 टीबीएम वापरण्यात येणार आहेत. उर्वरित उत्खनन न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धती वापरून केले जाणार आहे. (हेही वाचा, ठाकरे सरकार घेणार बुलेट ट्रेन प्रकल्पाचा फेरआढावा; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या Dream Project ला लागणार ब्रेक?)
320 किलोमीटर वेगाने धावणार बुलेट ट्रेन -
बोगदा बांधल्यानंतर ही ट्रेन अरबी समुद्रात ताशी 320 किलोमीटर वेगाने धावेल. बुलेट ट्रेनसाठी बांधण्यात येत असलेल्या बोगद्यातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे हा बोगदा एकाच नळीवर बांधलेला बोगदा असेल, तर बुलेट ट्रेनसाठी येण्या-जाण्यासाठी दोन ट्रॅक बांधावे लागतील. या प्रकल्पातील बोगद्याची लांबी 21 किलोमीटर आहे, तर प्रकल्पाची एकूण लांबी 508 किलोमीटर आहे. या प्रकल्पासाठी 1.08 लाख कोटी रुपये खर्चाचे नियोजन असून त्यासाठी 1389 हेक्टर जमीन वापरली जाणार आहे.