
केंद्र सेवेतील कर्मचाऱ्यांना नव्या वर्षात मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे. 7 व्या वेतन आयोगाच्या (7th Pay Commission) शिफारशीनुसार केंद्र सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (Dearness Allowance) जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. प्रसारमाध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे. अर्थात संभाव्य आर्थिक मंदीची शक्यता आणि पुन्हा एकदा येऊ पाहणारे कोरोनाचे संकट (COVID-19) या धोक्यामुळे अवघे जग चिंतेत असताना केंद्र सरकार मोठा महागाई भत्ता (DA) वाढविण्याची शक्यता आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, प्रतिकूल परिस्थिती असूनही, 2023 च्या सुरुवातीला केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता 2022 मध्ये मिळालेल्या महागाई भत्त्याच्या टक्केवारीपेक्षा जास्त असेल अशी अपेक्षा आहे. वाचकांच्या माहितसाठी असे की, जानेवारी 2022 मध्ये डी.ए. केंद्रीय कर्मचार्यांसाठी तीन टक्क्यांनी वाढ झाली आणि ती 31 टक्क्यांवरून 34 टक्क्यांवर पोहोचली. त्याच वर्षी, त्यात दुसऱ्यांदा वाढ होऊन 4% पर्यंत करण्यात आली. (हेही वचा, 7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! नवीन वर्षात मिळणार 'हे' तीन गिफ्ट; वाचा सविस्तर)
जानेवारी 2023 मध्ये DA 4% ने वाढवला जाण्याची शक्यता आहे. काही प्रसारमाध्यमांनी दावा केला आहे की, जानेवारी 2023 मधील DA वाढ पुन्हा एकदा मागील वर्षी दिवाळीच्या वेळी दिलेल्या महागाई भत्त्याप्रमाणे असेल. DA वाढीची घोषणा मार्च 2023 मध्ये केली जाईल आणि त्याच्या अंमलबजावणीची तारीख जानेवारी असेल, त्यानंतर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनाही थकबाकी मिळेल, असा दावा प्रसारमाध्यमांनी केला आहे.