Indian Job Searching Data: गेल्या काही दिवसांपासून जगभरातील कर्मचाऱ्यांना नोकर कपातीला (Layoffs) सामोर जाव लागत आहेत. अशातचं आता नोकरकपातीसंदर्भात नवीन डेटा समोर आला आहे. नोकर कपातीच्या पार्श्वभूमीवर भारतातील बहुसंख्य कर्मचारी (47 टक्के) त्यांच्या सध्याच्या संस्थांमध्ये राहणे पसंत करत आहेत, असं एका अहवालात दिसून आलं आहे.
सध्या नोकर्यांची गती मंदावली आहे, जानेवारी-मार्च कालावधीत केवळ 53 टक्के कर्मचारी कामावर आहेत. जे मागील तिमाहीत (ऑक्टोबर ते डिसेंबर 2022) 64 टक्क्यांवरून खाली आले आहेत. सध्याच्या अनिश्चिततेच्या दरम्यान, नोकरी शोधणारे आणि नियोक्ते यांची एकूण भावना सावध असल्याचे दिसते. तथापि, BFSI आणि हेल्थकेअर यांसारख्या काही क्षेत्रांमध्ये लक्षणीय भरती होत आहे, जे या क्षेत्रांसाठी एक भक्कम भविष्य दर्शवित आहेत, असं Indeed India चे प्रमुख शशी कुमार यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा -Dunzo बॅग्स $75 दशलक्ष निधी, 30 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकले, अहवालातून आले समोर)
याव्यतिरिक्त, 2023 मध्ये, मोठ्या प्रमाणावर गिग इकॉनॉमीच्या स्वीकृतीमुळे नोकरीची बाजारपेठ मजबूत होईल अशी अपेक्षा आहे. 2023 मध्ये सर्व नोकऱ्या शोधणाऱ्यांपैकी 37 टक्क्यांहून अधिक लोक त्यांच्या करिअरच्या वाढीला प्राधान्य देऊ पाहत आहेत. भारतातील BFSI क्षेत्राने या तिमाहीत या क्षेत्रातील 71 टक्के कर्मचारी नियुक्त केले आहेत.
दरम्यान, हेल्थकेअर (64 टक्के) आणि बांधकाम आणि रिअल इस्टेट (57 टक्के) ही इतर दोन क्षेत्रे आहेत ज्यांनी भरीव भरती केली. याउलट, माध्यम आणि मनोरंजन (49 टक्के), IT/ITeS (29 टक्के), आणि उत्पादन (39 टक्के) क्षेत्रांमध्ये या तिमाहीत सर्वात कमी नोकरभरती झाली. या निष्कर्षांवरून असे दिसून आले आहे की, सध्याच्या नोकरी शोधणाऱ्यांसाठी कार्यालयातून काम करणे हे पसंतीचे काम असल्याचं दिसून आलं आहे. 57 टक्के लोकांनी कार्यालयातून काम करण्यास प्राधान्य दिले आहे.
मार्च तिमाहीत सर्वात जास्त मागणी असलेली नोकरी ही किरकोळ विक्री सहयोगी (सर्व नियोक्त्यांपैकी 41 टक्के) आणि त्यानंतर प्रकल्प अभियंता (23 टक्के) आणि विपणन विश्लेषक (20 टक्के) यांची होती, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.