Indian Railways Representational Image (Photo Credits: Pixabay)

Indian Railways: रेल्वे मंत्रालयाने 'सार्वजनिक सेवा कार्यक्रमात एकापेक्षा जास्त ठिकाणी सर्वाधिक उपस्थिती'साठी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड (Limca Book of World Records) मध्ये स्थान मिळवले आहे. रेल्वे मंत्रालयाने (Ministry of Railways) 26 फेब्रुवारी 2024 रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते, ज्यामध्ये 2,140 ठिकाणी 40,19,516 लोक सहभागी झाले होते. भारतीय रेल्वे (Indian Railways) च्या या उत्कृष्ट सर्वसमावेशक प्रयत्नांचे आणि गतिमानतेचे कौतुक करण्यात आले आहे. यासोबतच या कार्यक्रमाची प्रतिष्ठित लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील रस्त्यावरील/अंडर ब्रिजचे उद्घाटन आणि रेल्वे स्थानकांच्या पायाभरणी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. तथापी, माहिती आणि प्रसारण मंत्री व रेल्वे मंत्री म्हणून अश्विनी वैष्णव यांनी पुन्हा एकदा पदभार स्वीकारला आहे. वैष्णव यांचे मंत्रालयात आगमन झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. रेल्वेशी पंतप्रधानांच्या मजबूत भावनिक संबंधावर भर देत केंद्रीय मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. (हेही वाचा -Ashwini Vaishnaw As Minister Of Railways : रेल्वेमंत्री म्हणून अश्विनी वैष्णव दुसऱ्यांदा मंत्री पद संभाळण्यास सज्ज, कार्यलयात पंतप्रधानाचं कौतुक)

पत्रकारांशी संवाद साधताना, वैष्णव यांनी गेल्या दशकभरात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली रेल्वे क्षेत्रातील महत्त्वपूर्ण सुधारणा आणि यशांवर प्रकाश टाकला. लोकांनी पंतप्रधान मोदींना पुन्हा देशाची सेवा करण्यासाठी आशीर्वाद दिला आहे. रेल्वेची भूमिका खूप मोठी असेल. गेल्या 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रेल्वेमध्ये खूप सुधारणा केल्या आहेत. रेल्वेचे विद्युतीकरण असो, नवीन ट्रॅक बांधणे असो, नवीन प्रकारच्या गाड्या, नवीन सेवा किंवा स्थानकांचा पुनर्विकास, ही गेल्या 10 वर्षातील पंतप्रधान मोदींची मोठी उपलब्धी आहे, असं वैष्णव यावेळी म्हणाले.

पंतप्रधानांनी रेल्वेवर लक्ष केंद्रित केले आहे कारण रेल्वे हे सामान्य माणसाचे वाहतुकीचे साधन आहे आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक मजबूत कणा आहे. मोदीजींचे रेल्वेशी भावनिक नाते आहे. मी पंतप्रधानांचे आभार मानतो, असंही अश्विनी वैष्णव यांनी यावेळी नमूद केलं.