As Minister Of Railways pc tw

Ashwini Vaishnaw As Minister Of Railways पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर एका दिवसात मंत्रिमंडळाच्या खात्यांची विभागणी करण्यात आली आहे. अश्विनी वैष्णव यांना पुन्हा एकदा रेल्वेमंत्री करण्यात आले आहे. दुसऱ्यांदा रेल्वेमंत्री म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला आहे. याशिवाय अश्विनी वैष्णव यांच्याकडे माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि आयटी मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. हेही वाचा- राष्ट्रपती भवनातील शपतविधी सोहळ्यावेळी कॅमेऱ्यात दिसणाऱ्या प्राण्याची ओळख पटली; दिल्ली पोलिसांकडून स्पष्टीकरण

2021 मध्ये अश्विनी वैष्णव पहिल्यांदा मंत्री बनले. 2024 पर्यंत त्यांच्याकडे दूरसंचार आणि आयटी मंत्रालयचा कार्यभार आला. अश्विनी वैष्णव हे ओडिश केडरच्या IAS अधिकारी आहेत. केंद्रीय मंत्र्याची कार्यालयात मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले आहे. त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे. पदभार स्वीकारण्यापूर्वी वैष्णव यांनी उपस्थितांना अभिवादन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागील 10 वर्षांच्या कार्यकाळातील रेल्वे क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी केली. अश्विनी वैष्णव यांना दुसऱ्यांदा पदभार मिळाल्यानंतर त्यांना पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले. लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा देशाची सेवा करण्यासाठी निवडणून दिले आहे. रेल्वेची भूमिका खूप मोठी असते. गेल्या 10वर्षात पंतप्रधानांनी रेल्वेत खुप सुधारणा केल्या आहेत असं अश्विनी वैष्णव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

अश्विनी वैष्णव यांनी मोदी सरकराच्या दुसऱ्या कार्यकाळात रेल्वे क्षेत्रातील सुधारण आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये सार्वजनिक खासगी भागीदारी मॉडेल स्थापित करण्याच्या प्रयत्नांसाठी ओळखले जाते. ओडिशाचे राज्यसभा सदस्य वैष्णव (53) यांची 2002 मध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.