K9 Vajra (Pic Credit - ANI)

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनच्या (China) प्रत्येक गैरप्रकारांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने (India) आपले विशेष शस्त्र तैनात केले आहे. पहिले K9-वज्र (K9 Vajra) स्वयंचलित होवित्झर रेजिमेंट नियंत्रण रेषेवर (LAC) तैनात करण्यात आली आहे. के 9-वज्र सुमारे 50 किमी अंतरावर शत्रूच्या स्थानांवर हल्ला करू शकतो. पूर्व लडाखच्या पुढच्या भागात तोफ तैनात करण्यात आली आहे. के 9-वज्र अशा वेळी तैनात करण्यात आले आहे जेव्हा चीनी सैन्य एलएसीला लागून असलेल्या भागात ड्रोन वापरत आहे. K-9 वज्राची निर्मिती भारतातच केली जात आहे. हे मुंबई स्थित फर्म लार्सन अँड ट्रुबो आणि दक्षिण कोरियन फर्म संयुक्तपणे बनवत आहे. भारतीय लष्कराने दक्षिण कोरियाच्या एका फर्मकडून 100 तोफांची मागणी केली होती, त्यानंतर या बंदुका वेगवेगळ्या रेजिमेंटमध्ये समाविष्ट केल्या जात आहेत.

दुसरीकडे आज लडाखचे उपराज्यपाल आर के माथूर यांनी गांधी जयंती निमित्त लेहमध्ये जगातील सर्वात मोठा खादी राष्ट्रध्वजाचे उद्घाटन आणि प्रतिष्ठापन केले. यावेळी लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे देखील घटनास्थळी उपस्थित होते. चीनसोबतच्या सीमेवरील वादाबाबत जनरल नरवणे म्हणाले, गेल्या 6 महिन्यांत परिस्थिती एकदम सामान्य आहे. आम्हाला आशा आहे की 13 व्या फेरीची बोलणी ऑक्टोबरच्या दुस -या आठवड्यात होईल आणि विलगता कशी होईल यावर आम्ही एकमत करू.

लष्कर प्रमुख एमएम नरवणे पुढे म्हणाले, चीनने आमच्या पूर्व कमांडपर्यंत पूर्व लडाख आणि उत्तर मोर्चात मोठ्या संख्येने लोकांना तैनात केले आहे. निश्चितपणे त्यांच्या पुढच्या भागात तैनात वाढ झाली आहे जी आमच्यासाठी चिंतेची बाब आहे.

भारतीय सैन्याच्या मते, एल अँड टी ने स्वदेशी बनावटीच्या के -9 वज्र टी 155 मिमी सेल्फ-प्रोपेल्ड गन्सच्या 100 युनिट्स पुरवल्या आहेत. एल अँड टी ने या वर्षी फेब्रुवारी मध्ये दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्याने लष्कराला 100 हॉविट्झर्स दिले आहेत. कंपनीने या संदर्भात मे 2017 मध्ये संरक्षण मंत्रालयाशी करार केला होता.  कंपनीने मेक-इन-इंडिया उपक्रम म्हणून के 9 वज्रच्या उत्पादनासाठी सुरतजवळ हजीरा उत्पादन संकुलात ग्रीन-फील्ड उत्पादन आणि चाचणी सुविधा उभारली होती.