पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा विदेश दौरा आणि त्यासाठी खर्च करण्यात आलेल्या पैशांवरुन सोशल मिडियावर टीका करण्यात येत आहे. मात्र मोदींनी केलेली परदेशवारी ही पर्यटन नसून देशात मोठी गुंतवणूक ठरली असून याबाबत राज्यसभेत खासदार वीके. सिंह यांनी स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
मोदींनी विदेश दौरा केल्याने भारतात मोठी गुंतवणूक झाली आहे. तसेच ज्या देशांनी भारतात गुंतवणूक केली आहे ते टॉप 10 देश असल्याचे वीके. सिंह यांनी सांगितले आहे. 2011 ते 2018 मध्ये अमेरिककडून भारतात 81 हजार मिलियन्स डॉलरची गुंतवणूक केली होती. तर मोदींच्या दौऱ्यानंतर 2014 ते 2018 रोजी ही गुंतवणूक 1 लाख 36 लाख मिलियन्सने वाढ झाली आहे.
नरेंद्र मोदींच्या 55 महिन्याच्या कार्यकालात 48 परदेश दौरे केले आहेत. तसेच 2014 साली 30 हजार मिलियन्स डॉलर एवढी होती. त्यानंतर ती 43 हजार 478.27 मिलियन्स अमेरिकी डॉलर एवढी वाढली आहे.