Gorakhpur Murder Case: गोरखपूरमध्ये दारू देण्यास विलंब झाल्याने दुकानातील कर्मचाऱ्याला ग्राहकांची मारहाण
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- Pixabay)

गोरखपूर (Gorakhpur) येथील एका कानपूर (Kanpur) व्यावसायिकाच्या हत्येच्या सुमारे 72 तासांनंतर एका मॉडेल दारूच्या दुकानात (Liquor stores) काम करणाऱ्या 25 वर्षीय व्यक्तीला ग्राहकांनी मारहाण केली आहे. ही घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. अहवालांनुसार, ही घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली. रामगढ ताल पोलीस स्टेशनपासून (Ramgarh Tal Police Station) सुमारे अर्धा किलोमीटर दूर ही घटना घडली आहे. पीडित मनीष प्रजापती हा मध्य प्रदेशचा रहिवासी होता आणि गेल्या काही महिन्यांपासून या मॉडेल दारूच्या दुकानात काम करत होता. गुरुवारी काही लोक दुकानात आले आणि त्यांनी दारूची ऑर्डर दिली. ऑर्डर मिळण्यास झालेल्या विलंबामुळे ग्राहक संतप्त झाले आणि यावर मनीषला शिवीगाळही करण्यात आली. या वादाचे लवकरच भांडणात रुपांतर झाले.

त्यानंतर ग्राहकांनी निर्दयीपणे मनीष आणि रघु या अन्य कर्मचारी सदस्यावर हल्ला केला. ग्राहकांनी त्यांच्या काही मित्रांना देखील बोलावले जे या हल्ल्यात सामील झाले आणि ते सुमारे 20 मिनिटे चालू राहिले. पोलिस येईपर्यंत हल्लेखोर पळून गेले होते.  दोन्ही जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. जेथे मनीषला मृत घोषित करण्यात आले.  रघु अजूनही रुग्णालयात दाखल आहे. जेथे त्याची प्रकृती गंभीर आहे.

पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सध्या आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. गोरखपूर पोलिसांनी ट्विट केले की एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. ज्यांची सीसीटीव्ही फुटेजवरून ओळख पटवली जात आहे. पोलिसांनी ट्विट केले की आरोपीं विरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल. हेही वाचा Moradabad Jail Inmate Attacked: उत्तर प्रदेशमधील कारागृहात एका कैद्यावर धारदार चमच्याने हल्ला, जखमी कैदी रुग्णालयात दाखल

आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके तैनात केली आहे. एसपी सिटी सोनम कुमार यांनी सांगितले की, घटनास्थळी फॉरेन्सिक टीम तैनात करण्यात आली आहे.  आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी तपास केला आहे. आरोपींना पकडण्यासाठी SWAT आणि पाळत ठेवण्यासह अनेक पथके तैनात करण्यात आली आहेत. लवकरच आरोपींना पकडले जाईल आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. शहरात गुन्हेगारीची 72 तासांतील ही दुसरी घटना आहे. याआधी एका रिअल इस्टेट व्यावसायिकाची हत्या झाल्याचे समोर आले होते.