
Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका पशुपालन व्यवसाय करणाऱ्याच्या घरात घूसून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळीस गोळीबार केला. या हल्ल्यामधील नेमकं कारण अद्याप समोर आले नाही. परंतु कुटुंबातील सदस्यांमध्ये जमिनी संदर्भात वाद होता त्यामुळे गोळीबार केला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. गोळीबाराची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (हेही वाचा- बेंगळुरूमध्ये 12 वर्षांच्या मुलीने खाल्ले लिक्विड नायट्रोजन पान; पोटात पडले छिद्र)
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे रविवारी रात्री एका संपुर्ण कुटुंबावर एकाने गोळीबार केला. व्हिडिओमध्ये दिसल्याप्रमाणे, हेल्मेट परिधान केलेला हल्लेखोरा घरात घुसून कुटुंबावर गोळीबार करत आहे. व्हिडिओत लहान मुलाचा रडण्याचा आवाजही ऐकू येत आहे. हल्ला झालेल्या कुटुंबातील राहुल पवार यांनी पोलिसांना या घटनेची तक्रार केली. त्याने सांगितले की, रात्री कोणीतरी दरवाजा ठोकला. दरवाजा उघडल्यानंतर हेल्मेट घातलेल्या दोन पुरुषांनी बंदूक दाखवली. घाबरून घरात पळल्यानंतर एका हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग केला.
देखिए उत्तर प्रदेश गाजियाबाद में बदमाशों ने घर मे घुस कर की फायरिंग, बच्चे के रोने से भी नही पिघला बदमाश का दिल वायरल वीडियो pic.twitter.com/NyepJZd5bE
— Lavely Bakshi (@lavelybakshi) May 20, 2024
त्यानंतर त्याने गोळीबार केला. जमिनीच्या वादातून कुटुंबातील सदस्याने हे कृत्य केल्याचा संशय राहुलने व्यक्त केला आहे. पोलिसांनी या घटनेची तक्रार नोंदवला आहे. या घटनेचा तपास सुरु आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. गाझियाबाद पोलिस ठाण्यातून आरोपीला पकडण्यासाठी पोलिस पथक तैनात करण्यात आले आहे.