Liquid Nitrogen Paan: अनेक लोकांना लिक्विड नायट्रोजन पान खायला आवडते. मात्र ही आवड कधी कधी हनिकारही ठरू शकते. याचेच एक मोठे उदाहरण बंगळुरूमधून समोर आले आहे. या ठिकाणी लिक्विड नायट्रोजन पान खाणे 12 वर्षांच्या अनन्याला महागात पडले. एप्रिल महिन्याच्या शेवटी हे पान खाल्ल्यानंतर मुलीला पोटाचा त्रास होऊ लागला. त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, जिथे तिच्या पोटात छिद्र पडल्याचे समोर आले. मुलीला बेंगळुरूच्या नारायणा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, डॉक्टरांनी मुलीवर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे. सर्जिकल टीमच्या म्हणण्यानुसार, मुलीच्या पोटावर इंट्रा-ऑप ओजीडोस्कोपी आणि स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी चाचण्या करण्यात आल्या, ज्यात तिच्या पोटात छिद्र असल्याचे उघड झाले. केवळ शस्त्रक्रियेच्या मदतीने मुलीला वाचवता येईल असे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यानंतर मुलीवर पेरिटोनिटिससाठी उपचार केले गेले. (हेही वाचा: ICMR On Side Effects of Covaxin: कोवॅक्सिनच्या दुष्परिणामांवर आयसीएमआरची प्रतिक्रिया; अभ्यासाचे लेखक व जर्नल संपादकांना कडक शब्दात फटकारले)
पहा पोस्ट-
12-Year-Old Girl Gets Hole In Her Stomach After Eating Liquid Nitrogen Paan In Bengaluru https://t.co/4cHhVyfVCq #Girl
— Oneindia News (@Oneindia) May 20, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)