Delhi Tinder Date Fraud: टिंडर या डेटिंग ॲपच्या माध्यमातून राजधानी दिल्लीतून एक अशी टोळी समोर आली आहे. जी तरुणांना कॅफेत आल्यावर धमकावून त्यांच्याकडून लाखो रुपये वसूल करून घेते. यामध्ये रेस्टॉरंटचा मालक, तिथे काम करणारा मॅनेजर, रेस्टॉरंटचे कर्मचारी आणि २५ वर्षीय तरुणीचा समावेश होता. ज्यात डेटिंग ॲपवर तरूणाचा शोध घेणे, नंतर त्याला कोणत्या तरी बहाण्याने रेस्टॉरंटमध्ये बोलावणे आणि नंतर अचानक रेस्टॉरंटमधून पळून जाणे हे मुलीचे काम होते. मुलगी कॅफेतून निघून गेल्यावर लगेचच मॅनेजर समोर बसलेल्या व्यक्तीला मोठं बिल देतो. हे बिल लाखात असते. समोरील व्यक्तीने बिल भरण्यास नकार दिल्यास त्याला धमकावण्यात येते. त्याला खोलीत बंद केले जायचे. संपूर्ण बिल भरेपर्यंत त्याला बाहेर जाऊ दिले जात नव्हते.
अशीच एक घटना 24 जून रोजी दिल्लीतील शकरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. ज्यात आयएएस इच्छुकाची एका तरुणीशी डेटिंग ॲप टिंडरवर मैत्री झाली होती. तरुणीने वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने त्याला लक्ष्मी नगर येथील ब्लॅक कॅफेमध्ये बोलावले होते. कॅफेमध्ये आल्यावर, जोडप्याने काही स्नॅक्स, दोन केक ऑर्डर केले. ज्यात वर्षा नावाच्या आरपीने फ्रूट वाईनचे चार शॉट्स घेतले. डेट मध्यात असतानाच आरोपी तरुणीने अचानक कौटुंबिक कारणास्तव तेथून काढता पाय घेतला आणि तेथून अचानक निघून गेली.
त्यानंतर कॅफ मॅनेजरने त्याला 1 लाख 21 हजार रुपयांचे बिल दिले. त्यावर तरुणाने आक्षेप घेतला तेव्हा त्याला धमकावले, ओलीस ठेवले आणि बिल भरण्यास भाग पाडले. पीडितेने संपूर्ण बिल ऑनलाइन भरले होते.
वर्षा गेल्यानंतर कॅफे मॅनेजरने येऊन 1 लाख 21 हजार रुपयांचे बिल दिले. जेव्हा पीडितेने बिलावर आक्षेप घेतला तेव्हा त्याला धमकावले, ओलीस ठेवले आणि बिल भरण्यास भाग पाडले. पीडित तरुणाने संपूर्ण बिल ऑनलाइन भरले. त्यानंतर त्याला जाऊ दिले. तरूणाने दिल्ली पोलिसांत फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपास केला असता तपासादरम्यान, पोलिसांना या रॅकेटची माहिती मिळाली. ऑनलाइन ट्रान्सफर केलेली रक्कम कॅफेच्या मालकांपैकी एक असलेल्या 32 वर्षीय अक्षय पाहवा याच्याकडे हस्तांतरित करण्यात आली होती. तर तरुणीचे नाव वर्षा दे देखील खरे नव्हते. तपासात वर्षा हिचे खरे नाव अफसान परवीन असल्याचे समोर आले. तिने डेटिंग ॲपवर वर्षा नावाने प्रोफाइल तयार केले होते. तिथे लोकांना टार्गेट करून, रेस्टॉरंटमध्ये नेऊन फसवले. बीलाचे 30 टक्के रक्कम मुलीने, 30 टक्के मालकाने स्वत:कडे तर 40 टक्के रक्कम व्यवस्थापक व उर्वरित कर्मचाऱ्यांनी घेतली होती. सध्या आरोप तरुणी फरार आहे.