Hyderabad Rape and Murder Case:आरोपींच्या एन्काऊंटवर अभिनेते अनुपम खेर, ऋषी कपूर यांच्यासह 4 कलाकारांनी व्यक्त केल्या सोशल मीडीयावर आपल्या प्रतिक्रिया!
Hyderabad Murder Case (Photo Credits-ANI)

हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणी (Hyderabad Rape and Murder Case) मुख्य चार आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री चारही आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी नाईलाजास्तव त्यांच्यावर गोळीबार केला. यात चारही आरोपींचा मृत झाला. पोलिसांनी आरोपींना ठार केल्याची बातमी सर्वत्र पसरल्यानंतर संपूर्ण देशातून हैदराबाद पोलिसांचे कौतुक होत आहे. या यादीत बॉलिवूड कलाकारांचाही समावेश झाला आहे. हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणी ऋषी कपूर (Rishi Kapoor), अनुपेम खेर (Anupam Kher),सोनल चौहान (Sonal Chauhan) आणि अक्केंनी नागार्जुन (Akkineni Nagarjuna) यांनीही ट्वीटरच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. हैदराबाद पोलिसांनी उत्तम कामगिरी केल्याचे ते म्हणाले आहेत.

हैदराबाद येथे 30 नोव्हेंबर रोजी एका महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करुन तिची निघृण हत्या करण्यात आली होती. यामुळे संपूर्ण देशात संतप्त वातावरण निर्माण झाले होते. सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने पोलिसांनी चारही आरोपींना काही तासातच अटक केली. त्यानंतर आरोपींना मोठी शिक्षा व्हावी, अशी मागणी देशभरातून करण्यात येत होत्या. यातच गुरुवारी 5 डिसेंबर रोजी याप्रकराणातील चारही आरोपींनी पोलिसांच्या जाळ्यातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावर पोलिसांनी त्यांना थांबण्याचे अवाहनदेखील केले. पंरतु, आरोपी थांबले नाहीत. यामुळे पोलिसांना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यात चारही आरोपी जागेवर ठार झाले. यामुळे देशभरातून हैदराबाद पोलिसांचे कौतूक केले जात आहे. यात बॉलिवूडचा कलाकारांनीही आपली प्रतिक्रीया नोंदवली आहे. हे देखील वाचा-Hyderabad Rape and Murder Case: आरोपींच्या एन्काउंटर बाबत उदयनराजे भोसले आणि चित्रा वाघ यांच्याकडून पोलिसांच्या कारवाईचे समर्थन

ऋषी कपूर यांचे ट्वीट-

अक्केंनी नागार्जुन यांनी नोदवल्या आपल्या प्रतिक्रिया-

सोनल चौहान यांचे ट्विट-

अनुपम खेर यांनी केलेले ट्विट-

हैदराबाद पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे संपूर्ण देशभरातून कौतूक केले जात आहे. एवढेच नव्हे तर, स्थानिक महिलांनी एन्काऊंटर केलेल्या पोलिसांच्या हातावर राखी बांधून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.