छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. वृत्तानुसार, येथे झालेल्या चकमकीत लष्कराच्या जवानांनी 9 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. दंतेवाडा एसपी गौरव राय यांनी सांगितले की, सुरक्षा दलांना दंतेवाडा-विजापूर सीमेवर मोठ्या प्रमाणात नक्षलवादी उपस्थित असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर सीआरपीएफ आणि डीआरजीच्या तुकड्या गस्तीसाठी पाठवण्यात आल्या. यावेळी नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विजापूर सीमेवरील जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये अजूनही चकमक सुरू आहे. (हेही वाचा -  Chhattisgarh: सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार; या वर्षात आतापर्यंत 139 नक्षलवादी ठार)

यापूर्वी 29 ऑगस्ट रोजी नारायणपूर आणि कांकेर जिल्ह्यांच्या सीमेवर मारहमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. आयजी बस्तर पी सुंदरराज यांच्या हवाल्याने चकमकीत तीन महिला नक्षलवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीत कोणताही सुरक्षा कर्मचारी जखमी झाला नाही.