Chhattisgarh: छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात मंगळवारी सुरक्षा जवानांनी (Security Forces) एका महिला नक्षलवाद्याला (Naxalite) ठार केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांकेरमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या चकमकीत (Encounter) तिला मारण्यात आले आहे. कांकेरच्या पोलीस अधीक्षक इंदिरा कल्याण एलेसेला यांनी सांगितले की, सुरक्षा कर्मचारी नक्षलविरोधी मोहीम राबवत असताना ही चकमक झाली. बेथिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिनागुंडा गावाजवळील जंगलात ही चकमक सुरू झाली.
जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी), बस्तर फायटर्स आणि सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) या प्रदेशात संयुक्त कारवाई करत होते, असे अधिकाऱ्याने सांगितले. ठार झालेल्या नक्षलवादी महिलेची ओळख पटवली जात आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितले. (हेही वाचा - Encounter In Kulgam: जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये चकमक; एक जवान शहीद)
यावर्षी छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची संख्या 139 वर पोहोचली आहे. त्यापैकी कांकेरसह सात जिल्ह्यांचा समावेश असलेल्या बस्तर विभागात 137 माओवादी ठार झाले, तर इतर दोन धमतरी येथे मारले गेले. (Naxalites Encounter: गडचिरोलीत 8 नक्षलवाद्यांचा खात्मा; 800 जवानांकडून ऑपरेशन)
दोन दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले. त्यानंतर चार दहशतवाद्यांना सैन्याने ठार मारले. जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवाद्यांच्या उपस्थितीच्या विशिष्ट माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी दहशतवादविरोधी कारवाया सुरू केल्या.