Encounter In Kulgam: जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) मधील कुलगाम (Kulgam) मधील मोदरघम भागात संयुक्त सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक (Encounter) झाली. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचा एक जवान शहीद झाला. तर दुसरा जवान जखमी झाला. जखमी जवानाला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुलगाममधील मोदरघम भागात संयुक्त सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. कुलगाम परिसरात दहशतवादी असल्याची गुप्तचर माहिती मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली. यादरम्यान लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली.
दरम्यान, लष्कराने 2 ते 3 दहशतवाद्यांना घेरले असल्याचे सांगण्यात येत आहे. या चकमकीत लष्कराचे दोन जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे उपचारादरम्यान एक जवान शहीद झाला. तत्पूर्वी, अधिकाऱ्यांनी सांगितले की, शनिवारी जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ आणि उधमपूर जिल्ह्यांमध्ये एका सहाय्यक उपनिरीक्षकासह सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) दोन जवान स्वतंत्र रस्ते अपघातात शहीद झाले. (हेही वाचा - IED Blast On Rajnandgaon-Maharashtra Border: राजनांदगाव-महाराष्ट्र सीमेवर IED स्फोट; 2 जवान जखमी)
या अपघाताची माहिती देताना अधिकाऱ्याने सांगितले की, वाहन रस्त्यावरून घसरले आणि कठुआ जिल्ह्यातील राजबागजवळील उझ कालव्यात पडले. या अपघातात हिमाचल प्रदेशचे रहिवासी एएसआय परशोतम सिंह हे शहीद झाले, तर त्यांचे दोन सहकारी बचावले. जसरोटा येथून राजबागकडे जात असताना परशोतम सिंग कार चालवत असताना त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. बचाव कर्मचाऱ्यांनी बीएसएफच्या दोन जवानांचे प्राण वाचविण्यात यश मिळवले, परंतु परशोतम सिंग हे जोरदार प्रवाहामुळे वाहून गेले आणि नंतर ते गंभीर अवस्थेत सापडले. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (हेही वाचा -Chhattisgarh Shocker: छत्तीसगडमध्ये दोन वेगवेगळ्या घटनेत विहीरीत पडून 9 जणांचा मृत्यू; विषारी वायुमुळे 5 जणांनी गमावला जीव)
दुसऱ्या अपघातात, उधमपूर जिल्ह्यातील चेनानी-नाशरी बोगद्याच्या आत बीएसएफ जवान अमित कुमार शुक्ला यांचा कॅब उलटल्याने मृत्यू झाला. अमित शुक्ला हे जम्मू-काश्मीरमध्ये तैनात होते. ते रजेवर झारखंड येथील त्यांच्या घरी जात होते.