Representational Image (File Photo)

Chhattisgarh Shocker: छत्तीसगडमध्ये दोन जिल्ह्यांत शुक्रवारी घडलेल्या दोन वेगेवेगळ्या घटनांमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. वेगवेगळ्या कारणांत विहिरीत पडून 9 जणांचा मृत्यू  (People Death) झाला. जांजगीर येथील घटनेत विहिरीत आढळलेल्या विषारी वायू गळती (Poisonus Gas)मुळे 5 जणांचा मृत्यू झाला. तर, कोरबा येथे विहिरीत पडलेल्या वडिलांना वाचवण्यासाठी मुलीने विहिरीत उडी मारली. त्यानंतर त्या दोघांना वाचवण्यासाठी कुटुंबातील आणखी दोन विहिरीत उतरले. दुदैवाने त्यात दोघांचाही मृत्यू झाला.

जांजगीरमधील चंपा येथे शुक्रवारी 5 जूलै रोजी सकाळी साडेसात वाजता विहिरीत पडलेली लाकडं काढण्यासाठी एक व्यक्ती विहिरीत उतरला. परंतु विहिरीत विषारी वायू असल्यामुळे त्याला भोवळ आली श्वास गुदमरला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याला वाचवण्यासाठी शेजारी राहणारे चारजण एक एक करून खाली उतरले होते. मात्र. त्यातील कोणीही जिवंत बाहेर येऊ शकले नाही. त्यांचाही विषारी वायुमुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

आजूबाजूच्या लोकांना मृत्यूची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार आणि बिररा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. एसडीआरएफच्या टीमलाही पाचारण करण्यात आलं. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे.

दुसऱ्या घटनेत कोरबा जिल्ह्यातील जुराली गावातील डिपारापारा येथे विहिरीत बुडून चार जणांचा मृत्यू झाला. या घटनेत वडिल विहिरीत पडल्यानंतर मुलीने त्यांना वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली होती. यानंतर कुटुंबातील इतर दोन सदस्यही विहिरीत उतरले होते. यात त्या सर्वांचा मृत्यू झाला.