Photo Credit- X

CDS Bipin Rawat Chopper Crash: देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत (CDS Bipin Rawat) यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या संसदीय समितीने आपल्या अहवालात Mi-17 V5 हेलिकॉप्टर क्रॅश (Chopper Crash) होण्यामागील मानवी चुका असल्याचे स्पष्ट सांगितले आहे. 8 डिसेंबर 2021 रोजी CDS जनरल बिपिन रावत यांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर अनेक तर्कवितर्क लावले गेले. (CDS Bipin Rawat Funeral: अलविदा जनरल! CDS बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका यांच्यावर दिल्लीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार, मुलींनी दिला मुखाग्नी)

जनरल रावत, पत्नी मधुलिका रावत आणि जवान शहीद

तामिळनाडूमधील कुन्नूरजवळ त्यांचे लष्करी हेलिकॉप्टर क्रॅश होऊन जनरल रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि इतर जवान शहीद झाले होते. मंगळवारी संसदेत अहवाल सादर केला गेला. संरक्षणविषयक स्थायी समितीने 13 व्या संरक्षण योजनेच्या कालावधीत झालेल्या भारतीय हवाई दलाच्या विमानांच्या अपघातांच्या संख्येवरील डेटा सादर केला. 2021-22 मध्ये भारतीय हवाई दलाच्या 9 विमानांचे अपघात झाले. 2018-19 मध्ये 11 विमान अपघातांसह एकूण 34 अपघात झाले. या अपघातांमध्ये 'मानवी त्रुटी' असल्याचे सांगितले गेले.

अहवालाबाबत असेही म्हटले आहे की, या चौकशी समित्यांच्या शिफारशींमध्ये अपघाताची पुनरावृत्ती रोखण्याच्या उद्देशाने प्रक्रिया, कार्यपद्धती, प्रशिक्षण, उपकरणे, संस्कृती, ऑपरेशन्स, देखभाल आणि प्रशासन यांचा सर्वांचाच आढावा घेतला जातो," असे अहवालात म्हटले आहे.

8 डिसेंबर 2021 रोजी अपघात झाला

8 डिसेंबर 2021 रोजी, बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि इतर 11 जणांनी तामिळनाडूच्या कुन्नूर भागात हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावला. बिपिन रावत यांना त्यांच्या सेवेसाठी PVSM, UYSM, AVSM, YSM, SM, VSM आणि पद्मविभूषण प्रदान करण्यात आला. ते द्रष्टे नेते आणि अभ्यासू सैनिक होते.

गंतव्यस्थानापासून 10 किमी अंतरावर अपघात 

अपघातावेळी Mi-17 V5 हेलिकॉप्टर वेलिंग्टनमधील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज (DSSC) कडे जात होते. तेथे जनरल रावत प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना संबोधित करणार होते. हेलिकॉप्टरने सकाळी 11:50 वाजता सुलूर आयएएफ स्टेशनवरून उड्डाण केले. परंतु त्याच्या गंतव्यस्थानापासून फक्त 10 किमी अंतरावर दुपारी 12:20 वाजता त्यांचा अपघात झाला. प्रत्यक्षदर्शी हेलिकॉप्टर दाट धुक्यात कमी उंचीवर उड्डाण करत होते त्यामुळे ते दरीत कोसळले आणि नंतर झाडांमध्ये अडकले असे सांगण्यात आले होते.