शिवराज सिंह चौहान (Photo Credit: IANS)

मध्य प्रदेशमध्ये भाजपचे आमदार राज्याची सत्ता बदलण्यासाठी सज्ज आहेत. अशा परिस्थितीत संपूर्ण शहर ग्रेसेस रिसॉर्टमधील आमदारांच्या कामकाजावर डोळा ठेवून आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानही बुधवारी दुपारी येथे पोहचले. सर्व आमदारांनी कधी गोलंदाजी, तर कधी फलंदाजी करून आपला तणाव दूर केला. विधानसभा फ्लोअर टेस्टच्या शक्यतेमुळे भारतीय जनता पार्टी आपल्या सर्व आमदारांसह रात्री 8.30 च्या सुमारास सीहोरमधील ग्रॅसेस रिसॉर्टमध्ये पोहोचली. अशा स्थितीत राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) भोपालमध्ये आपल्या भाजप सहकाऱ्यांसह क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. राजकीय गुगली टाकणारे शिवराज सिंह चौहान यांनी यावेळी फलंदाजीचाही आनंद घेतला त्यांनी जोरदार चौकार आणि षटकार लगावले. (MP Political Crisis: बंगळूरु येथे हॉटेल बाहेर आंदोलनासाठी बसलेल्या दिग्विजय सिंह यांना पोलिसांकडून अटक)

शिवराज सिंह चौहान यांनी स्वतः क्रिकेट खेळत असताना व्हिडिओ ट्विट केला आहे. या ट्विटवर केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू म्हणाले की, तुम्ही सरळ षटकार मारला म्हणून शिवराज जी तुम्हाला आऊट करू शकलो नाहीत. शिवराज यांनी दोन ट्विट शेअर केले. यातील एकामध्ये ते गोलंदाजी तर दुसऱ्यामध्ये फलंदाजी करताना दिसत आहेत. चौहान यांनी ‘हाऊझॅट’ या कॅप्शनसह फोटोज शेअर केली.

शिवराज यांची बॅटिंग

चौहान नोव्हेंबर 2005 ते डिसेंबर 2018 या काळात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले होते. कॉंग्रेस सरकारमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत संकटामुळे मुख्यमंत्री कमलनाथ विधानसभेत फ्लोर टेस्टमध्ये अपयशी ठरल्यास भाजपा पुन्हा सरकार स्थापन करू शकेल. 61 वर्षीय शिवराज विदिशा मतदारसंघातून चार वेळा खासदार म्हणून काम पाहत आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकल्यानंतर तेथील मध्य प्रदेशामध्ये सरकारला मोठा धक्क बसला. सिंधिया यांच्या पाठोपाठ त्यांच्या समर्थकांनीही राजीनामे दिल्याने आता मुख्यमंत्री कमलनाथ यांचं सरकार धोक्यामध्ये आले आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण 230 जागा आहेत. त्यापैकी 114 जागांसह काँग्रेस सत्तेत आहे. भाजपाकडे 107 जागा आहे. बसपा 2, समाजवादी पक्षाची 1 आणि चार अपक्ष आमदार असं सध्याचं राजकीय बलाबल होते.