Lucknow News: लखनऊच्या (Lucknow) एका शाळेतील 9वीच्या वर्गातील विद्यार्थ्याला ह्रदयविकाराचा झटका आल्याची खळबळजनक घडना उघडकीस आली आहे. अचानक ह्रदयविकाराचा झटका आल्याने मुलगा जमिनीवर कोसळला. शिक्षकांनी लगेच त्याला रुग्णालयात दाखल केले परंतू डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शाळेने एका निवेदनात म्हटले आहे की, या कठीण काळात मुलाच्या कुटुंबासोबत उभे आहे आणि कोणत्याही तपासात पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिटी मॉन्टेसरी स्कूल, अलीगंज शाखेचा नववी वर्गात शिकणारा चौदा वर्षीय आतिफ सिद्दीकी बुधवारी रसायनशास्त्राच्या वर्गात बेशुद्ध पडला. शाळेच्या शिक्षिका आणि शाळेच्या परिचारिकांनी कार मध्ये बसवून तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेलं. इतर शिक्षकाच्या मदतीने त्याच्या वडिलांना फोन करून ही घटना सांगितली. मुलाचे वडिल रुग्णालयात दाखल झाले.
"डॉक्टरांनी अनेकदा कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (CPR) देऊनही मुलाला शुद्धीवर आले नाही, तेव्हा कळवण्यात आले की मुलाला कदाचित हृदयविकाराचा झटका आला आहे आणि त्याला ताबडतोब लारी कार्डिओलॉजी हॉस्पिटलमध्ये नेण्यात यावे," असे प्रवक्ते ऋषी खन्ना यांनी सांगितले.
"शिक्षक आणि परिचारिका वैद्यकीय केंद्राने प्रदान केलेल्या रुग्णवाहिकेत ऑक्सिजन सिलिंडरसह मुलाला लारी रुग्णालयात घेऊन गेले. कार्डिओलॉजी इमर्जन्सीमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले," पोलीसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस या घटने अंतर्गत कायदेशीर कारवाई करतील अशी माहिती दिली आहे.