Punjab: हरभजन सिंहची मोठी घोषणा, राज्यसभेचा पगार शेतकऱ्यांच्या मुलींसाठी करणार दान
File Image | Harbhajan Singh | (Photo Credits: IANS)

माजी क्रिकेटपटू आणि सध्या आम आदमी पक्षाचे (AAP) राज्यसभा खासदार हरभजन सिंह (Harbhajan Singh) यांनी एक उदात्त पुढाकार घेतला आहे. राज्यसभा सदस्य म्हणून मिळालेला पगार शेतकऱ्यांच्या मुलींसाठी दान करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. याबाबत हरभजन सिंहने ट्विट करून लिहिले आहे की, मी आपला पगार शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षण आणि कल्याणासाठी दान करणार आहे. त्यांनी लिहिले की, राज्यसभेचा सदस्य म्हणून मला माझा पगार शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी आणि कल्याणासाठी द्यायचा आहे. मी माझ्या देशाच्या भल्यासाठी योगदान देण्यासाठी राजकारणात सामील झालो आहे आणि मी जे काही करू शकतो ते करेन.

Tweet

प्रश्न झाले होते उपस्थित

पंजाबमधून आम आदमी पक्षाचे राज्यसभा सदस्य म्हणून हरभजन सिंह यांची निवड झाल्यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यांनी उघडपणे शेतकर्‍यांना पाठिंबा दिला नाही, असे त्यांच्यासाठी बोलले जात होते. हरभजन सिंहने गेल्या वर्षी 24 डिसेंबर रोजी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. यानंतर ते लवकरच काँग्रेस किंवा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र, तसे न झाल्याने त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला. (हे देखील वाचा: हार्दिक पटेल यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, निवडणूक लढविता येणार, शिक्षेला स्थगिती)

23 वर्षे खेळले क्रिकेट

हरभजन सिंहची क्रिकेटमध्ये 23 वर्षांची कारकीर्द आहे. जगातील सर्वोत्तम फिरकीपटूंमध्ये त्याची गणना होते. त्याने 2011 च्या विश्वचषक स्पर्धेत 9 विकेट्स आणि 2007 च्या T20 विश्वचषकात 7 विकेट्स घेतल्या होत्या.