गुजरातच्या (Gujarat) राजकोट (Rajkot) येथून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाची माहिती होताच पतीने तिच्या प्रियकराची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना 16 सप्टेंबर रोजी घडली आहे. याप्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी ताला पोलीस अधिक तपास करीत आहेत. यासंदर्भात टाईम्स ऑफ इंडियाने माहिती दिली आहे.
हसमुख कमलिया (वय, 35) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. हसमुखला दोन मुले असून त्याच्या पत्नीचे अतुल केसवाला नावाच्या तरूणासोबत प्रेमसंबंध सुरु होते. हसमुखला याची माहिती झाली. त्यानंतर हसमुख अतुल केसवालची हत्या करण्याचे ठरवले त्यानुसार, हसमुखने 16 सप्टेंबरच्या रात्री सासन-तालाळा रस्त्यावरील गल्याड गावाजवळ केसवालच्या पोटात चाकू भोसकून त्याची हत्या केली. याप्रकरणी हसमुखला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर चौकशीदरम्यान हसमुखने हत्येची कबूली दिली आहे. हे देखील वाचा- Jharkhand Shocker: जेवण वाढायला उशीर झाला म्हणून नवऱ्याकडून बायकोची हत्या, झारखंडच्या खुंटी जिल्ह्यातील धक्कादायक घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हसमुख आणि अतुल हे दोघेही जेपूर (गिर) गावचे रहिवाशी आहेत. दरम्यान, अतुल हा दररोज हसमुखच्या पत्नीशी फोनवर बोलायचा. हसमुखला त्याची पत्नी आणि अतुल या दोघांच्या नात्यावर संशय आला. त्यानंतर एके दिवशी हसमुखने या दोघांची फोन रेकॉर्डिंग ऐकली. ज्यामुळे हसमुखला त्याच्या पत्नीच्या विवाह्य संबंधांबाबत माहिती झाली. त्यानंतर हसमुखने अतुलची हत्या केली आहे. वर चाकूने वार केले.