प्रतीकात्मक फोटो (Photo Credits: ANI)

जम्मू कश्मीरमधील (Jammu kashmir) अनंतनाग (Anantnag) येथील पोलीस उपायुक्त कार्यालयावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला (Grenade Attack) केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या हल्ल्यात वाहतूक पोलीस (Traffic police), पत्रकारासह (Journalist) स्थानिक लोकांनाही किरकोळ जखम झाली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत. तसेच सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेराव घालून दहशतवाद्यांविरोधात (Terrorists) शोध मोहीम सुरु केली आहे.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शनी पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी अनंतनागच्या डीसी कार्यालयाबाहेर सुरक्षा दलाला लक्ष्य करून ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात वाहतूक पोलीस, पत्रकारासह 10 स्थानिक लोक किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचवेळी सुरक्षा दलाने संपूर्ण परिसर घेराव घालून दहशतवाद्यांविरूद्ध शोध मोहीम सुरू केली आहे. हे देखील वाचा-सर्जिकल स्ट्राईकला आज 3 वर्षे पूर्ण; भारतीय लष्कराने 'असा' केला दहशतवाद्यांचा खात्मा, पाहा व्हिडिओ.

एएनआयचे ट्वीट-

याआधीही जम्मू-कश्मीरतील रामबन येथे शनिवारी सैन्य दलाच्या जवानांवर दहशतवादी हल्ला झाला होता. यात ३ दहशवाद्यांनी सैन्याचे वाहन थांबवून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यावेळी वाहनचालकाने वाहन न थांबवून हुशारी दाखवली होती. त्यानंतर भारतीय सुरक्षा दलाने दहशतवाद्यांचा शोध घेवून त्यांना ठार केले होते.