Gold | Image For Representation (Photo Credits: Pixabay)

Gold Price Today: सोन्याचा भावात आज म्हणजेचं शुक्रवारी सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅममागे दहा रुपयांनी वाढ झाली आहे. सोनं खरेदीदार अजूनही सोन्याच्या किंमती खाली येण्याची प्रतीक्षा करीत आहेत. मात्र, एप्रिलच्या सुरूवातीपासूनचं सोन्याच्या भावात मोठी घसरण झालेली नाही. हिंदू कॅलेंडरमध्ये नवीन आर्थिक वर्ष आणि त्यानंतर नवीन वर्ष सुरू झाल्याने सोन्याच्या खरेदीदारांना फारसा दिलासा मिळाला नाही. सध्या देशभरात लग्नाचा हंगाम सुरू झाल्याने सोन्याची मागणी जोर धरत आहे.

आपण आज सोने खरेदी करत असल्यास, 22 कॅरेट सोन्यासाठी आपल्याला प्रति 10 ग्रॅम 44,860 रुपये द्यावे लागतील. तसेच 22 कॅरेट सोन्यासाठी तुम्हाला प्रति 100 ग्रॅमसाठी 4,48,600 रुपये द्यावे मोजावे लागतील. (वाचा - Gold Shopping: सोने खरेदी करत असाल तर हा नवा नियम नक्की वाचा; बनावट सोने ओळखणे आता होणार सोपे)

मुंबई, दिल्ली, पुणे, नागपूरमध्ये आज सोन्याचे भाव (10 ग्रॅमसाठीचे दर)

मुंबईत आज सोन्याची किंमत 22 कॅरेटसाठी 44,860 रुपये आणि 24 कॅरेटसाठी 47,600 रुपये आहे. दिल्लीत शुक्रवारी सोन्याच्या किंमती 22 कॅरेटला 45,860 रुपये आणि 24 कॅरेटसाठी 50,030 रुपये आहेत.

पुण्यात आज सोन्याचा दर 22 कॅरेटसाठी, 44,860 रुपये आणि 24 कॅरेटसाठी, 45,860 रुपये आहे. शुक्रवारी नागपुरातील सोन्याचा दर 22 कॅरेटसाठी 44,860 रुपये आणि 24 कॅरेटसाठी 45,860 रुपये आहे. चेन्नईमध्ये आज सोन्याच्या किंमती 22 कॅरेटला 43,630 रुपये आणि 24 कॅरेटसाठी 47,600 रुपये आहेत. बंगळुरूमध्ये आज 22 कॅरेटला सोन्याची किंमत 43,700 रुपये आणि 24 कॅरेटसाठी 47,670 रुपये आहे. हैदराबादमध्ये आज सोन्याच्या किंमती 22 कॅरेटसाठी 43,700 रुपये आणि 24 कॅरेटसाठी 47,670 रुपये आहे.